Provident Fund : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुमचे जर पीएफ खाते असेल. तर ही बातमी तुम्हाला नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे .आज मी तुम्हाला शाळा स्कीम बद्दल सांगणार आहे. ज्या मध्ये तुम्ही सात लाख रुपये पर्यंत रक्कम मिळवता येते पण हा फायदा फक्त पीएफ खाते धारकांसाठीच आहे. ते कसे चला तर आपण ह्या लेखांमध्ये त्याची सविस्तर माहिती पाहूया.
तुम्ही जर पीएफ खातेधारक आहात तर तुम्हाला एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स EDLI म्हणजे योजनेबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. EDLI योजना ही EPFO द्वारे चालवली जाते ही एक विमा योजना आहे जीपीएफ खातेधारकांसाठी उपलब्ध असते जर एखादा EPFO सदस्याचा नोकरीवर असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला EPFO च्या EDLI योजनेअंतर्गत 7 लाख रुपये पर्यंत मदत मिळत असते.
EDLI ही योजना कधी सुरू करण्यात आली
EDLI ही योजना EPFO ने 1976 मध्ये सुरू केली होती परंतु काही कारणास्तव EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ह्या योजनेची सुरुवात केली होती. हे विमा संरक्षण कर्मचाऱ्यांना पूर्णपणे मोफत दिले जाते त्यासाठी त्याला वेगळे योगदान देण्याची गरज नसते. या योजनेसाठी कंपनी योगदान देते.
EDLI योजनेचे काय फायदे आहे ?
- जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीवर असताना मृत्यू झाल्यास ईपीएफ सदस्याच्या नॉमिनीला 7 लाख रुपयांचा विमा लाभ मिळतो.
- मृत सदस्य त्याच्या मृत्यूपूर्वी 12 महिने सतत काम करत असेल तर किमान नामांकित व्यक्तीला 2.5 लाख रुपयांचा विमा मिळतो.
- यामध्ये कर्मचाऱ्याला कोणतेही योगदान द्यावे लागत नाही.
नॉमिनी दावा करू शकतो?
कर्मचाऱ्यांचा काली मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला विमा संरक्षण दावा करता येतो. यासाठी निर्देशित व्यक्तीचे वय किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी असल्यास पालक त्याच्या वतीने दावा करू शकतो दावा करताना मृत्युपत्रावर उत्तराधिकारी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.