Close Visit Mhshetkari

Land Registry : प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Land Registry : मित्रांनो जमीन असो प्लॉट असो किंवा इतर मालमत्तेचे खरेदी विक्री करणे हा महसूल मिळवण्याचा सरकारचा एक महत्त्वाचा आणि उपयुक्त स्त्रोत आहे.आता आपल्याला माहित असेल की पाच दिवसाचा आठवडा झाल्यामुळे या खरेदी विक्री करण्यासंदर्भात अडथळा निर्माण होत होता.आता यासाठी सरकारने सुता यावी यासाठी महसूलमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

प्रॉपर्टी खरेदी विक्री होणार सोपी

महसूल विभागाचा कार्यभार सुरळीत व्हावा व त्यांच्यावरील कामाचा रोड कमी व्हावा यासाठी सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. आता शनिवारी आणि रविवारी सुद्धा उपनिबंधक कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. थोडक्यात आता आपण आपल्या प्लॉट शेती व इतर मालमत्तेची खरेदी विक्री शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुद्धा करू शकणार आहेत

राज्यात काही ठिकाणी हा प्रयोग सुरू करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नगर शहरात नवीन महसूल इमारतीचे भूमिपूजन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

हे पण पहा --  Land Registry : जमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? पहा सविस्तर माहिती ...

Land Registry new rules

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना सोमवार ते शुक्रवार या दिवशी नोकरी काम इतर ठिकाणी आपल्या कामानिमित्त व्यवसायासाठी जावे लागते. अशा वेळेस खरेदी विक्री व्यवहार करण्यास मोठे अडथळे निर्माण येतात.

शिवाय उपनिबंधक कार्यालयात सदैव गर्दी आपल्याला पाहायला मिळते अशावेळी नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवार उपनिबंधक कार्यालय सुरू ठेवणे संदर्भात सरकारने निर्णय घेतलेला आहे.

सदरील निर्णयाचा विचार केल्यास झाल्यास सरकारचा महसूल सुद्धा वाढणार असून सर्वसामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे.सर्व शासकीय कामे एकाच छताखाली कशी येतील, याचे नियोजन सुरु आहेमहसूल विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Leave a Comment