Close Visit Mhshetkari

Land Registration ID : 7/12 वरील लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे काय? तो कसा शोधावा लागतो..पहा सविस्तर माहिती

Land Registration ID : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. आणि ह्या बातमीचा तुम्हाला नक्कीच फायदा आहे.7/12 मधील जमीन नोंदणी आयडी हे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जमिनीच्या तुकड्यासाठी एक अद्वितीय क्रमांक आहे. तुम्हाला हे राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाकडून दिले जाते. आणि ते जमिनीच्या मालकी हक्क आणि इतर महत्त्वाच्या माहितीचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी वापरले जाते .

लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे काय?

मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाल्यास जसे की व्यक्तीला एक ओळख म्हणून आधार क्रमांक देण्यात येतो. त्याचप्रमाणे आता महसूल विभागा कडून शेतकऱ्यांच्या प्रत्येक जमिनीला एक विशिष्ट क्रमांक दिला गेला आहे. या क्रमांकाची ओळख ULPINक्रमांक या नावाने ओळखले जाते.

लँड रजिस्ट्रेशन आयडी हा एक युनिक आयडेंटीफिकेशन नंबर आहे. तो वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला नियुक्त केला जातो. महाराष्ट्रामध्ये या नंबरला ULPIN या नावाने ओळखले जाते. म्हणजेच तुम्हाला याचा फुल फॉर्म सांगायचे झालायस Unique Land Parcel Identification Number असा होतो.

तुम्हाला हा नंबर महाराष्ट्राच्या प्रत्येक सातबारा उतारा वर मिळेल सातबारा मध्ये विशिष्ट जमिनीची संबंधित भूवैज्ञानिक माहिती देण्यात येते. की मातीचा प्रकार भूखंडाचा आकार यात पिके कोणती घेतली जाते. सिंचन व इतर कृषी तपशील संबंधित यामध्ये माहिती समाविष्ट असते .

Land Registration id 

तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की हा लँड  रजिस्ट्रेशन आयडी कसा शोधायचा व कोणत्या ठिकाणी असतो? असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा नंबर शोधण्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सातबाराच्या वेबसाईटवर जायचे आहे. अगोदर तुम्हाला त्यासाठी सातबारा काढावा लागेल. तुम्ही ज्यावेळी सातबारा काढाल त्यावर त्यावेळी तुम्हाला त्यावर हा नंबर मिळणार आहे.

हे पण पहा --  Jamin Kayda : देवस्थानाची जमीन नावावर होऊ शकते का ? महाराष्ट्र जमीन कायदा काय सांगतो ? पहा सविस्तर ..….

तुम्हाला जरा अजून सोप्या पद्धतीने सांगायचे असेल तर महाराष्ट्रातील 7/12 वर Land Registration id सातबारा वरती कसा शोधायचा याविषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे.

Land Registration id कसा शोधावा?

  1. सर्वप्रथम भुलेख महाभूमीच्या ऑनलाइन पोर्टलवर जायचे आहे.https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  2. तुम्हाला दिलेल्या विभागापैकी उदाहरणार्थ कोकण अमरावती पुणे नाशिक औरंगाबाद व नागपूर
  3. 7/12 निवडा जर तुम्ही 7/12 निवडले असेल तर आवश्यक असलेल्या जमिनीच्या नोंदीसाठी जिल्हा, गाव आणि तालुका निवडायचे आहे
  4. नंतर तुम्हाला तुमचे नाव, रेकॉर्डमधील नाव, सर्व्हे नंबर इ., आडनाव आणि पूर्ण नाव किंवा वर्णमालानुसार सर्वेक्षण क्रमांक/गट क्रमांक टाकायचा आहे 
  5. खाली तुमचा मोबाईल नंबर भरा 7/12 पहा शोधा वर क्लिक करा आवश्यक तपशीलांसह 7/12 स्क्रीनवर दिसेल.
  6. अशाप्रकारे तुम्हाला तुमचा लँड रजिस्ट्रेशन आयडी सहजरित्या मिळू शकतो

तुम्ही तुमचा नंबर लक्षात ठेवून जमिनीशी संबंधित संपूर्ण कागदपत्रेऑनलाईन सहजरीत्या मिळवू शकता

1 thought on “Land Registration ID : 7/12 वरील लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणजे काय? तो कसा शोधावा लागतो..पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment