PVC Aadhaar Card : आता फक्त 50 रूपयांत मिळवा ATM सारखे स्मार्ट आधार कार्ड ! पहा सविस्तर प्रोसेस… 

PVC Aadhaar Card : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाईल क्लोराईड म्हणजे PVC Aadhar Card जारी करत आहे.आता हे पीव्हीसी आधार कार्ड कसे ऑर्डर करायचे? याची प्रोसेस सविस्तर पाहूया.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाईल क्लोराईड म्हणजे PVC आधार कार्ड जारी करत आहे. हे प्लास्टिकचे आधार कार्ड ATM सारखेच आहे आणि ते टिकाऊ आणि वापरण्यास सोपे आहे. 

How to Download PVC Aadhaar Card

1. UIDAI ची अधिकृत खाली दिलेल्या वेबसाइट ला भेट द्या.

2. ‘माय आधार’ विभागात ‘ऑर्डर आधार PVC Card’ या वर क्लिक करा.

3. 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID टाका.

4. खाली सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड टाकून ‘Send OTP’ वर क्लिक करा.

5. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर खाली दाखवलेल्या ‘सबमिट’वर क्लिक करा.

हे पण पहा --  Disguised Aadhar Card : आधार कार्डामुळे होणाऱ्या स्कॅमपासून बचाव करायचा आहे? आजच डाऊनलोड करा मास्क्ड आधार कार्ड ! पहा सोपी प्रक्रिया ..

6. तुमच्या आधारशी संबंधित PVC Card ची प्रिव्ह्यू कॉपी दिसेल.

7. जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर ‘विनंती OTP’ समोर दिलेल्या संबंधित पर्यायावर क्लिक करा.

8. नवीन मोबाइल नंबर टाका आणि ‘तुम्हाला OTP पाठवा’ बटणावर क्लिक करा.

9. 50 रुपये डिजिटल माध्यमांद्वारे भरा.

10. तुमचे PVC आधार कार्ड मागवले जाईल.

11. हे पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे तुमच्या घरी 15 दिवसात पोहोचेल.

PVC आधार कार्डचे फायदे 

  • टिकाऊ आणि वापरण्यास सोपे
  • ATM सारखेच आकार आणि डिझाइन
  • खिशात किंवा पर्समध्ये सहजपणे ठेवता येते
  • बनावट आधार कार्डपासून सुरक्षा
  • तुमच्या आधार डेटासाठी QR कोड

अधिक माहितीसाठी :

UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in ला भेट द्या.

UIDAI च्या टोल-फ्री नंबर 1947 वर कॉल करा.

Leave a Comment