Group insurance : सरकारी कर्मचारी गट विमा योजना 1982; पहा योजनेचे स्वरूप फायदे,वर्गणी,विमा रक्कम आणि शासन निर्णय

Group Insurance : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी गट विमा योजना ही एक सरकारी योजना आहे,जी महाराष्ट्र सरकारच्या कर्मचार्‍यांना विमा संरक्षण देते.राज्य शासकीय कर्मचार्‍यांची विमा योजना 1982 पासून अंमलात आली.

1 मे 1982 रोजी शासकीय सेवेत असणाऱ्या किंवा त्या तारखेनंतर प्रवेश केलेल्या अनिवार्य असलेल्या सर्व कर्मचार्‍यांना ही योजना लागू करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना विमा संरक्षण योजनेचे दुहेरी लाभ त्यांच्या कुटुंबियांना सेवेतील मृत्यू झाल्यास आणि निवृत्तीनंतर त्यांचे संसाधन वाढविण्यासाठी (कमी खर्चात आणि संपूर्ण योगदान आणि स्व-वित्तपुरवठा आधारावर) देय देण्याचे उद्दीष्ट आहे.

कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना आणि राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982 या स्वतंत्र असणार आहे.सरकारी कर्मचारी सेवेत असतांना सदस्याचा अपघाताने मृत्यु झाल्यास राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982 अंतर्गत देय विमा निधी रक्कमे व्यतिरीक्त समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेखालील लाभ देय असेल.

मृत्यु लाभ : या योजनेअंतर्गत, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबासाठी एक विमा रक्कम दिली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या वेतनावर आधारित असते.

अपंगत्व लाभ : या योजनेअंतर्गत, जर एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आले तर त्याला एक विमा रक्कम दिली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या अपंगत्वाच्या तीव्रतेवर आधारित असते.

सेवानिवृत्ती लाभ : या योजनेअंतर्गत, जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला एक विमा रक्कम दिली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या वेतनावर आधारित असते.

गटविमा योजना 1982 – समाविष्ट कर्मचारी

शासन निर्णय दिनांक 18/02/2017 नुसार सदर राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यामध्ये भारतीय वन सेवा,भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व राज्यातील शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

यासोबतच निमशासकीय स्थापनेवरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व निमशासकीय कार्यालय, जिल्हा परीषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत,महानगरपालीका,नगरपालीका,नगरपरिषदा, नगरपंचायत, शासकीय महामंडळे, मंडळे,सार्वजनिक उपक्रम,सांविधानिक संस्था,मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था/महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, पारंपारिक विद्यापीठे यांच्या अधिकारी/कर्मचारी यांना देखील लागू करण्यात आली आहे.

Interest calculation of Group Insurance System

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या सदस्यास अपघाती मृत्यु अथवा कायमस्वरुपी अपंगत्व/विकलांगता असल्यास खालील तक्त्यानुसार लाभ अनुज्ञेय आहे.

हे पण पहा --  India Post Insurance : पोस्टाचा अवघ्या 795 रुपयात 20 लाखांचा अपघाती विमा; पहा कसा घ्ययचा योजनेचा लाभ घ्या

अपघाताचे स्वरुप आणि टक्केवारी

  • अपघातामुळे आलेला मृत्यु 100
  • अपघातामुळे आलेले कायमचे अपंगत्व/विकलांगता 100
  • अपघातात दोन हात, दोन पाय, किंवा दोन्ही डोळे गमवून अपंगत्व/ विकलांगता आल्यास 100
  • अपघातामध्ये एक हात, एक पाय, किंवा डोळा गमवून अपंगत्व/ विकलांगता आल्यास 50
  • कायमचे अशत: अपंगत्व/विकलांगता
  • दोन्ही पायांचे अंगठे 20
  • अंगठ्याचे दोन्ही भाग 5
  • अंगठ्याचे एक भाग 2
  • दोन्ही कानाचे बहिरेपण 50
  • एका कानाचे बहिरेपण 15
  • एका हाताची चारी बोटे व अगंठा 40
  • हाताची चार बोटे 35
  • हाताच्या अगंठ्याचा एक पेरा 25
  • हाताच्या अगंठ्याचे दोन्ही पेरे 10
  • तर्जनीचे तिन्ही पेरे 10
  • तर्जनीचे दोन्ही पेरे 8
  • तर्जनीचा एक पेरा 4
  • मधल्या बोटाचे तिन्ही पेरे 6
  • मधल्या बोटाचे दोन्ही पेरे 4
  • मधल्या बोटाचा एक पेर 2
  • अनामिकेचे तिन्ही पेरे 5
  • अनामिकेचे देान्ही पेरे 4
  • अनामिकेचा एक पेर 2
  • करांगळीचे तिन्ही पेरे 4
  • करांगळीचे दोन्ही पेरे 3
  • करांगळीचा एक पेर 2
  • बोटे व मनगट यांना जोडणाऱ्या अस्थी (metacarpals)
  • पहिले व दुसरे बोट (अतिरिक्त) 3
  • तिसरे, चौथे व पाचवे बोट (अतिरिक्त) 2
अपघात विमा योजना 2023

राज्य कर्मचारी “गटविमा योजना 1982” नुसार निधीमधील दि.01 जानेवारी 2023 पासून राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 (Government Employees Group Insurance news) च्या अंतर्गत विमा निधीमधील जमा रकमांवर दर साल दर शेकडा 4% दरात मिळणाऱ्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नसून 4% दराने विमा निधीमधील जमा रक्कमेवर व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे.

अपघात गट विमा योजनेतील सदर सुधारणेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक कार्यालय प्रमुख्यांने त्यांच्या अधीनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून अपघात विमा वर्गणी माहे फेब्रुवारी, 2023 देय मार्च 2023 च्या वेतनातून व तदनंतर दरवर्षी कपात करणे आवश्यक आहे.

शासन निर्णय दिनांक 24 जानेवारी, 2023 नुसार दिनांक 01 एप्रील 2023 पासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रक्कम (Capital Sum Insured) यामध्ये वाढ करण्यात येत असून व सदर वर्गणी व राशीभूत रक्कम खालीलप्रमाणे गटनिहाय निर्धारित करण्यात येत आहे.

गट राशीभूत विमा रक्कम वार्षिक वर्गणी वस्तू व सेवाकर एकूण वार्ष‍िक वर्गणी

  • गट-अ रू.25 लाख रु. 750/- रु.135/- रु.885/-
  • गट-ब रू.20 लाख रु. 600/- रु.108/- रु.708/-
  • गट-क रू.15 लाख रु. 450/- रु.81/- रु.531/-
  • गट-ड रू.15 लाख रु. 450/- रु.81/- रु.531/-

Leave a Comment