Close Visit Mhshetkari

MCX Cotton : पहिल्याच दिवशी कापूस खरेदी केंद्रावर 200 क्विंटल कापसाची आवक! मिळाला ‘भाव’

MCX Cotton : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे.पहिल्याच दिवशी केंद्रावर २०० क्विंटल कापसाची आवक झाली.

MCX Cotton market live

कापूस खरेदी केंद्रावर जवळपास १६ वाहनांमधून २०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. सदरील कापसाला पहिल्याच दिवशी प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार २९० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला आहे.

यावर्षी प्रथमच कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी बाजारात कोरडा कापूस विक्रीसाठी आणावा, असे बाजार समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.

भारतातील कापूस बाजार भाव 

  • आंध्र प्रदेश मधील कॉसि मध्ये 6670,कोवतl येथे 6621 तर हलाहारवी येथे 6932 रुपये दर मिळतो आहे.
  • हरियाणा मधील सिवनी मध्ये 6750 रुपये,एहोनाबाद 6300,सिरसा 7750 दर चालू आहे.
  • तेलंगाना मधील कुबीर 6900,भैंसा 6500 तर बोथ येथे 6630 रुपये भाव मिळत आहे.
  • गुजरात मधील जांबूसर 6200,कावी 6300 रुपये , भावनगर मध्ये 7000 रुपये तर राजूला 6340 आणि राजकोट 7200 भाव मिळत आहे.
हे पण पहा --  Cotton Verity : कापसाच्या या वाणाची उत्पादकता हेक्टरी १६ ते १८ क्विंटल, कोरडवाहू जमिनीसाठी होतेय शिफारस

Leave a Comment