Close Visit Mhshetkari

Aadhar Card Name Change : नववधूचे लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे ? पहा संपूर्ण प्रोसेस

Aadhar Card Name Change : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे भारतात आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे सद्यस्थितीत संपूर्ण देशात लग्नाचा धडाका चालू असताना नव्हता पण त्यासाठी एक महत्त्वाचा विषय बनतो तो म्हणजे नवविवाहित वधूचे आधार कार्ड वरील नाव कसे बदलायच? सध्या संपूर्ण भारतभर लग्नाचा हंगाम सुरू आहे.

Aadhar Card Name Change procces

जेव्हा लग्न झालेल्या मुलीचे आधार कार्ड वरील नाव बदल करायचा असेल तर या संदर्भात अनेक समस्या निर्माण होतात.आधार कार्डचा वापर पॅनकार्ड,मतदान कार्ड,रेशन कार्ड कढण्याबरोबर बँकेत अकॉउंट ओपन करण्यासाठी, शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा वापर होतो.आज आपण लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव कसे बदलायचे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

आधार कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा : – विवाह प्रमाणपत्र,लग्नाचे निमंत्रण पत्र,लग्न मंडपाचे प्रमाणपत्र, राजपत्र नोटीस (नाव बदल दर्शवणारी)

पत्ता पुरावा :- पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, वीज बिल, टेलिफोन बिल, रेशन कार्ड (सर्व कागदपत्रांवर तुमचा सध्याचा पत्ता असणे आवश्यक)

हे पण पहा --  Fake Aadhaar Card : तुमच्याकडेही असू शकते बनावट आधार कार्ड, क्यूआर कोड व नावाद्वारे असे ओळखा ...

जुन्या नावाचा उल्लेख असलेले कोणतेही सरकारी कागदपत्र (उदा. शालेय प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र)

अलीकडील दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो

सर्व कागदपत्रांची स्वतःहून आणि अधिकृत व्यक्तीकडून प्रमाणित प्रत जमा करा.

आधार अपडेट फॉर्म भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरा.

शुल्क ऑनलाइन किंवा आधार सेवा केंद्रात रोख रक्कमेने भरा.

आधार कार्डमध्ये नाव बदल ऑनलाइन प्रोसेस 

1. UIDAI च्या [https://uidai.gov.in/](https://uidai.gov.in/) वर जा.

2. “आधार अपडेट” पर्याय निवडा.

3. “नाव” पर्याय निवडा आणि तुमचे नवीन नाव प्रविष्ट करा.

4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

5. सबमिट करा आणि URN क्रमांक मिळवा.

6. शुल्क भरा.

आधार कार्डमध्ये नाव बदल ऑफलाइन प्रोसेस

1. जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या.

2. आधार अपडेट/सुधारणा फॉर्म भरा.

3. आवश्यक कागदपत्रे जमा करा.

4. शुल्क भरा.

5. URN क्रमांक मिळवा.

तुम्ही UIDAI च्या https://uidai.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.तसेच आपण 1800-1800-1234 वर आधार सहाय्य केंद्राला कॉल करू शकता.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment