National Education Policy : नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षी पासून लागू! पहा शासन निर्णय व संपूर्ण शैक्षणिक धोरण PDF मध्ये

National Education Policy :  202 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 29 जुलै, 2010 रोजीच्या बैठकीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला  मंजुरी देण्यात आली आहे.”राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020″ नुसार शिक्षण क्षेत्रात कोणकोणते नवीन प्रयोग केले जाणार आहेत? कोणकोणते नवीन बदल होणार आहे हे? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

New National Education Policy 2020

  • नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या 10+2+3 या रचनेमध्ये बदल करून 5+3+3+4 याप्रमाणे रचनात्मक बदल केला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरांपर्यच्या शिक्षणाचा समावेश केला आहे.
  • प्रथम 5 वर्षामध्ये पूर्व प्रथामिक शिक्षणाची ३ वर्ष व इयत्ता 1 ली व 2 री चा समावेश केला आहे.असून या स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये खेळ,शोध कृती आधारीत शिक्षण देण्यात येणार आहे.
  • पुढील ३ वर्षामध्ये इयत्ता 3 री ते 5 वी या वर्गामध्ये कृती व खेळ आधारित परस्पर संवादी अभ्यासक्रम विकसित करून विद्यार्थ्यांचे बौध्दिक विकास साध्य करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020

  • पुढील 3 वर्षामध्ये इयत्ता 6 वी ते 8 वी करिता कृती आधारित प्रायोगिक अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायीक हस्तकला व कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यात येणार आहे.
  • पुढील 4 वर्षामध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी या 4 वर्षात 40 वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीप्रमाणे विषय घेण्याची मुभा देण्यात येणार आहे.इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी बोर्डाच्या परिक्षेचे अवास्तव महत्त्व कमी करण्यात येईल.
हे पण पहा --  School Admission 2023 : इयत्ता पहिली प्रवेशाचे वय बदलले, नवे शैक्षणिक धोरण लागू; केंद्र सरकारचे राज्यांना 'हे' आदेश

New National Education Policy

उच्च माध्यमिक वर्गामध्ये कला,विज्ञान व वाणिज्य हा शाखाभेद न ठेवता आवडीचे विषय निवडता येतील तसेच पुढे पदवी पातळीवरही आवडीचे विषय निवडता येतील. 2020 शैक्षणिक सत्र 2022-23 म्हणजेच चालू होणाऱ्या नवीन सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

Leave a Comment