Close Visit Mhshetkari

LPG Cylinder New Rules : गॅस सिलेंडर नियमात मोठे बदल,पहा आता तुम्हाला वर्षाला किती मिळणार सिलेंडर

LPG Cylinder New Rules : घरगुती एलपीजी ग्राहकांना आता नव्या नियमानुसार एका कनेक्शनवर वर्षभरात किती सिलेंडर मिळणार आहेत यासंबंधी नवीन नियम आला आहे.तसेच कोणताही ग्राहक एका महिन्यात किती सिलिंडर घेऊ शकणार हे पण बदलले आहे. तिन्ही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

गॅस सिलेंडर नियमात मोठे बदल

आता ग्राहकांसाठी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची संख्या निश्चित करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार आता ग्राहकांना वर्षभरात फक्त 15 सिलिंडर खरेदी करता येणार आहेत. कोणत्याही ग्राहकाला एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. याशिवाय ग्राहकांना महिन्यात फक्त दोनच सिलिंडर घेता येणार आहेत. ग्राहकांना २ पेक्षा जास्त सिलिंडर मिळणार नाहीत. आतापर्यंत सिलिंडर मिळविण्यासाठी महिन्याचा किंवा वर्षाचा कोटा निश्चित करण्यात आला नव्हता.

आतापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेवढे सिलिंडर मिळत होते. आता नव्या नियमानुसार,घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात १५ सिलिडरच मिळणार आहेत.घरगुती एलपीजी सिलिंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार सिलिडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत.तसेच याची तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

New Rules of LPG Gas Cylinder 2022

अनेकदा हॉटेल व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा करतात.यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

जर एखाद्या व्यक्तीला अधिक सिलिंडर हवे असतील तर त्यांना यासाठी वैध कागदपत्रे दाखवावी लागतील, ज्यामध्ये हे का नमूद केले जाईल. आणखी सिलिंडर हवेत? देशात गॅस सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. गेल्या ५ वर्षांत देशात ५८ वेळा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे.

Lpg gas cylinder price updates

पेट्रोलियम मंत्रालयाच्या अहवालानुसार 1 एप्रिल 2017 ते 6 जुलै 2022 दरम्यान गॅसच्या किमतीत 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल 2017 मध्ये जिथे गॅस सिलिंडरची किंमत 723 रुपये होती, ती जुलै 2022 मध्ये 1053 रुपये झाली आहे. गेल्या वर्षभरात गॅस सिलिंडरच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. जुलै 2021 ते जुलै 2022 या कालावधीत एलपीजी गॅसची किंमत 26 टक्क्यांनी वाढून 834 रुपये प्रति सिलेंडरवरून 1053 रुपये झाली आहे.

Leave a Comment