Close Visit Mhshetkari

विहीर मोटर योजना 50% अनुदान Electric Motor Anudan Yojana

Electric Motor Anudan Yojana : शेतकऱ्यांना मोटार खरेदी करण्यासाठी पैसे नसतात किंवा विहीर मोटार खरेदी भक्कम पैसे मोजावे लागते. तसेच काही शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी असते पण मोटार नसते.

तर आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची करण्याची गरज नाही. तुम्हाला विहीर मोटारसाठी अनुदान मिळणार आहे. तर या योजनेचा लाभ नक्की घ्या.ही योजना शेतकऱ्यांनासाठी फायद्याची ठरणार आहे. अर्ज कसा करायचा व कुठे करायचा अशी संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

electric motor subsidy
electric motor subsidy

सिंचन विहीर मोटार अनुदान योजना

  शेतीला पाणी देण्यासाठी तुमच्याकडे सिंचन विहिर असेल तर पाणी उपसा करण्यासाठी त्यावर सिंचन मोटार बसविणे आवश्यक असते. इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप पैसे मोजावे लागतात.
बऱ्याच शेतकरी बांधवांकडे या सिंचन मोटार खरेदी करण्यासाठी पैसे नसतात परिणामी विहिरीमध्ये पाणी असून देखील ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देवू शकत नाहीत.(सिंचन विहीर मोटार अनुदान योजना)

  अशावेळी तुम्ही शासकीय अनुदानावर इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार खरेदी करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना mahadbt web portal वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा लागतो, योजना मंजूर झाल्यावर कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.

हे पण पहा --  tractor subsidy : ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र सुरु, असा करा लगेच अर्ज

विहीर मोटार अनुदान योजना ऑनलाईन अर्ज

(विहीर मोटार अनुदान योजना ऑनलाईन अर्ज ) पद्धत पुढील प्रमाणे आहे.
•• https://mahadbtmahait.gov.in हा web address सर्च करा.

•• तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाडीबीटी शेतकरी पोर्टल ओपन होईल.तुमचा युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगइन करा.

•• आधार नंबरला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर  otp घेवून देखील तुम्ही लॉगइन करू शकता.

•• लॉगइन केल्यावर अर्ज करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
•• सिंचन साधने व सुविधा या ऑप्शनवर क्लिक करा.
तुमचा तालुका गाव आणि सर्व्हे क्रमांक या संदर्भातील संपूर्ण माहिती अगोरच तुम्हाला या ठिकाणी दिसेल जर हि माहिती दिसली नाही तर मन्युअलि टाका.

•• मुख्य घटक या पर्यायासाठी सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.बाबीमध्ये पंपसेट इंजिन व मोटर या पर्याय निवडा.

किती क्षमतेचा सिंचन पंप तुम्हाला हवा आहे त्या संदर्भातील पर्याय निवडा.
•• नियम व अटीच्या स्वीकृतीसाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा.
•• सर्वात शेवटी जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment