Land Record : सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवणे सुलभ व्हावे आणि त्यातून शासनाची महसूल वसुली व्हावी या अनुषंगाने 7/12 सदरी ज्या ठिकाणी भोगवटादार वर्ग 2 असे नमूद आहे त्या जमिनी नजराणा भरून वर्ग 1 करण्याबाबत धोरण राबविण्यात येत आहे.
Agriculture land record
शासन निर्णय 9 जुलै 2022 नुसार इनाम जमिनी भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप करण्यात आलेल्या होत्या.त्या जमिनीवर शासनाने वेगवेगळ्या अटी आणि शर्ती टाकून त्या वाटप केलेल्या होत्या.जमीन भोगवटदार वर्ग 2 असल्याने या जमिनीवर खरेदी विक्री,हस्तांतरण,गहाणखत,भाडेपट्टा किंवा इतर कोणतेही व्यवहार करता येत नव्हते.आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा तरतुदी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम यामध्ये करण्यात आलेले आहे.
भोगवटदार म्हणजे काय ?
जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर ‘भोगवटा २’ अशी नोंद land record असते.या जमिनींची खरेदी-विक्री करताना नजराणा भरणे आवश्यक असते.नजराणा भरल्यानंतर या जमिनीचा मालकी हक्क ‘भोगवटा १’ (खालसा) या नोंदीने निर्वेध केला जातो.
महसूल भोगवटदार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्याने प्रधान केलेली जमीन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचे नियम,2019 नुसार राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी ,विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.त्यासंबंधी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषद ऊहापोह करण्यात आला.त्यात महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडला आहे.
भोगवटादार रूपांतर करण्याची प्रक्रिया
भोगवटादार वर्ग 2(Bhogvatdar 2) च्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 (Bhogvatdar 1) मध्ये रुपांतरीत करण्यासाठी तुम्हाला अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या पन्नास टक्के इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.तेव्हा महारास्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी नुसार ही जमीन तुम्हाला भोगवटादार क्रमांक 2 मधून भोगवटादार क्रमांक 1 मध्ये रुपांतरीत करून मिळेल.
क्रमांक दोनची जमीन भोगवटादार क्रमांक 1 मध्ये करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेलअर्जाचा नमुना खाली दिलेला आहे.
भोगवटादार वर्ग रूपांतर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-
1. जमीन मालक यांनी करावयाचा विनंती अर्ज
2. जमिनीचे 50 वर्षाचे उतारे व खाते उतारा
3. विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
4. 7 बारा व उतारा मधील सर्व फेरफार नोंदी
5. आकरबंदाची मूळ प्रत
6. एकत्रीकरनाचा मूळ उतारा
7. मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलायत
8. तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा
जमीन घेताना खालील बाबी काटेकोरपणे पालन करावे :-
1. जमीनीचा उतारा पाहून त्यावरील भूधारना पद्धतीत कोणता शेरा आहे हे पहावे.जर त्यात भोगवटादार वर्ग 2 किंवा न.अ.श असा शेरा आला की सदर जमीन ही शासनाच्या पूर्व परवानगीनेच खरेदी करावी लागेल हे नी निश्चित करावे.
2. जमीन भोगवटादार वर्ग 2 ची आहे.परंतू ती कोणत्या प्रकारात आहे हे पहावे.उदा.सिलिंग जमीन,प्रकल्पग्रस्ताची जमीन, सैनीकाची जमीन,आदिवासी जमीन,कुळ जमीन इ.हे पहाण्यासाठी 7/12 वरील इतरहक्क मालकी हक्क नावे पहावे.
3. जर 7/12 वरून जमीन वर्ग-2 ची आहे परंतू ती कोणत्या प्रकारची आहे हे कळत नसेल तर तलाठी कार्यालय,तहसील कार्यालयातून सदर जमीनीचा प्रवर्ग कोणता आहे हे तपासवे.
4. देवस्थान महसूल माफीची जमीन,वन जमीन,गायरान जमीन या जमिनीची खरेदी विक्री व्यवहार होत नाहीत.अशा जमिनींच्या बाबत कोणताही व्यवहार करू नये.
Old agriculture land record
5. ज्या खातेदारची आपण घेणार आहोत त्या खातेदाराच्या सर्व वरसांचे नाहरकत व परवानगी किंवा इतर नोंदणीकृत दस्ताने परवानगी घेणे आवश्यक आहे.
6. भोगवटादार वर्ग 2 चा खातेदार भूमिहीन होणार नाही अशा पद्धतीने जमीन खरेदी करणे केव्हाही चांगले.कारण जर तो भूमिहीन झाला तर कालंतराने वाद उभा राहू शकतो.
7. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीची खरेदी व आदिवासी खातेदाराची जमिनी खरेदी याबाबत कायदे वेगवेगळे आहेत. आदिवासी खातेदाराची जमीन खरेदी करण्यासाठी शासनस्तरावरून मंजूरी लागते.
8. आदिवासी खातेदाराची जमनी स्वतात मिळते म्हणून शासनाचा पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही मार्गाने ती घेण्याचा प्रयत्न करू नये.