Close Visit Mhshetkari

Drough Crop insurance : पिकविम्याचा ट्रिगर-टू लागू झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट! खरीप पीक नुकसान भरपाई मिळणार ….

Drough Crop insurance : शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू केला असून महाराष्ट्रातील ४३ तालुके दुष्काळी ठरविले आहे. खरीप २०२३ हंगामा दुष्काळाचे मूल्यांकन महा मदत प्रणाली द्वारे करण्यात आले आहे. आता या तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे.

सदरील ट्रिगर टू लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपायोजना केंद्र नागपूर, यांच्यावतीने तयार केलेल्या महा मदत ॲपचा वापर करावा लागणार आहे.

खरीप पीक नुकसान भरपाई

खरीप हंगमात सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस, शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. तीन पेक्षा अधिक आठवड्याचा खंड, पाणी पातळीत घट,अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट,पिकांचे नुकसान, चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पाणीटंचाई या सर्व बाबी विचारात घेऊन दुष्काळ संदर्भातील ट्रिगर-टू लागू करण्यात आला आहे. 

नुकसान भरपाई पिकांची यादी – कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, कांदा पिकांना नुकसान भरपाई मिळू शकते.

पीक नुसकान भरपाई समाविष्ट संभाव्य तालुके 

  • नाशिक – मालेगाव, सिन्नर, येवला
  • पुणे – बारामती, दौंड, इंदापूर,मुळशी-पोंड,पुरंदर-सासवड, शिरुर-घोडनदी व वेल्हे
  • सोलापूर – बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला 
  • जालना – अंबड, बदनापूर, भोकरदन,जालना व मंठा सांगली – कडेगाव, खानापूर-विटा,मीरज, शिराळा 
  • सातारा – खंडाळा व वाई 
  • कोल्हापूर – हातकणंगले व गडहिंग्लज
  • छ. संभाजीनगर – संभाजीनगर व सोयगाव
  • बीड – आंबेजोगाई, धारुर व वडवणी, रेणापूर, लोहारा, 
  • धाराशिव व वाशी
  • बुलढाणा – बुलढाणा व लोणार
  • उल्हासनगर, शिंदखेडा,नंदुरबार
हे पण पहा --  Pik vima list : पीक विमा जमा झाला नसेल, तर लगेच करा काम तरच मिळेल विमा

प्रतिहेक्टर नुकसान भरपाई – पीक रुपये (प्रतिहेक्टर) कापूस :- ४९,५००

  • भुईमूग :- ४२,९७१
  • मका :- ३५,५९८ 
  • कांदा :- ८१,४२२
  • ज्वारी,बाजरी :- ३०,०००
  • मूग :- २०,०००

थोडक्यात दिवाळीपर्यंत या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी ८ हजार ५०० ते २२ हजार खरीप पीक नुकसान भरपाई मिळू शकते.

पिक विमा 25% अग्रीम मंजूर जिल्हे यादी येथे पहा

Crop insurance list

Leave a Comment