Cotton Market Rate : खेतिया बाजार समितीत मुहूर्ताला पहिल्या दिवशी 120 क्विंटल कापूस खरेदी; कापसाला मिळाला एवढा बाजार भाव ?

Cotton Market Rate : नमस्कार मित्रांनो, मध्य प्रदेश मधील खेतिया बाजारपेठेत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला प्रारंभ झालेला आहे. त्यावेळी कापसाला 7 हजार 501 रुपये बाजार भाव मिळाला आहे.पहिल्या दिवशी बाजारपेठेत साधारणपणे 120 क्विंटल कापसाची आवक झाली.

MCX Cotton Market Rate

सोमवार पासून कापूसबाजारात मुहूर्तासह कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. बाजार समितीच्या प्रांगणात व्यापारी शेतकरी आणि मोठी गर्दी केली होती. कापूस खरेदी प्रारंभ होत असताना, वाहनांची वर्दळ पाहायला त्यावेळी बाजार समितीच्या प्रांगणामध्ये व्यापारी शेतकरी हमाल आणि माथाडी कामगारांची मोठी संख्या दिसून आली.

सर्वात प्रथम पहिले वाहन जोतवाडे महाराष्ट्र येथील शेतकरी मनोज सुखदेव सदाराव यांच्या कापसाला 7 हजार 501 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव देण्यात आला.

मित्रांनो कापूस खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला शुभारंभ प्रसंगी कापसाला जास्तीत जास्त साधारण7 हजार 700 रुपये तर कमीच 5050 रुपये आणि सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

हे पण पहा --  Agricultural cotton update : कापसाचे भाव कोसळले ! शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट, शेतकरी वर्ग हतबल !

कापूस बाजार भाव

बाजार समितीमध्ये एकूण 16 वाहनांची आवक झाली होती. साधारणपणे 120 क्विंटल कापूस यावेळी खरेदी करण्यात आला. आमदार शंभर डी प्रांताधिकारी रमेश सुशोधिया बाजार समिती सचिव मनसाराम जमरे ,खेतिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष अमित मालवीय यासोबत अनेक व्यापारी प्रतिष्ठित शेतकरी आणि परिसरातील कापूस उत्पादक क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

मध्यप्रदेश महाराष्ट्र आणि गुजराततील शेतकऱ्यांसाठी खेती आहे प्रसिद्ध बाजारपेठ आहे पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ म्हणून खेतीया कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध आहे.मागील हंगामात हंगामात खेतिया बाजार समितीमध्ये ७,३८,७३५ क्चिटल कापसाची आवक झाली होती.

Leave a Comment