HRA Hike : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित असेल की, नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची वाढ मिळालेली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे.
मित्रांनो DA नाहीतर याबरोबर आणखी एका भत्त्यात मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ बघायला मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार असून आता 53 % दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.
मित्रांनो Dearness Allowance वाढल्यामुळे आणखी एका भत्त्याची आपोआप आपल्या पगारात वाढ होणार आहे तर काय आहे बातमी ? पाहूया सविस्तर
घरभाडे भत्ता वाढणार !
सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयाच्या, वास्तव्याच्या ठिकाणानुसार 27%, 18% आणि 9% प्रमाणे घरभाडे भत्ता मिळत आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्याची रक्कम ही 50 टक्क्यापेक्षा अधिक होईल, त्यावेळी घरभाडे भत्ता मध्ये X,Y आणि Z वर्गीकृत शहरांना, अनुक्रमे 3,2 आणि 1 टक्क्यांपर्यंतची वाढ होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणांनुसार 30%, 20% आणि 10% प्रमाणे घर भाडे भत्ता दिला जाईल.
सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 % दराने महागाई भत्ता मिळत आहे.जुलै 2024 पासून महागाई भत्ता 53% होणार आहे. सदरील निर्णय हा हिवाळी अधिवेशनानंतर घेतला जाणार असून DA Hike जुलै महिन्यापासूनच लागू राहणार आहे.