Close Visit Mhshetkari

electricity bill : दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांसाठी मोठा फटका वीज दरात होणार मोठी वाढ ; सर्वसामान्यांना पडणार प्रति युनिट…

electricity bill : सणासुदीच्या काळात महावितरणने इंधन समायोजन शुल्क आकारून पुन्हा वीज महाग करीत ग्राहकांना मोठा ‘शॉक’ दिला आहे. कंपनीच्या नवीन आदेशानुसार, घरगुती ग्राहकांना सप्टेंबरच्या बिलासाठी प्रति युनिट ३५ पैसे जास्त द्यावे लागतील. कंपनीच्या अकार्यक्षमतेचा फटका आता सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे महावितरण इंधन समायोजन शुल्क आकारून पुन्हा वीज महा करीत ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे.कंपनीच्या आदेशानुसार हा नवीन बदल करण्यात आलेला आहे.काय आहे बदल हे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

किती मोजावे लागणार वीज शुल्क

महावितरणाचे मुख्य अभियंता वीज खरेदी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार असे म्हटले आहे की महाराष्ट्रात वीज नियमक आयोगाच्या सूचना नुसार कंपनी सप्टेंबर मध्ये वापरलेली वीज इंधन समायोजन शुल्क वसूल करणार आहे ही वसुली येत्या काही महिन्यात सुरूच राहणार आहे असे आदेश महावितरण मुख्य अभियंता यांनी दिले आहेत.

हे पण पहा --  Smart Meter : आता या वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर ! किंमत असणार तब्बल ..

कंपनीच्या आदेशाचा परिणाम बीपीएल ग्राहकातील बीपीएल श्रेणीतील ग्राहकावर होणारा असून या सोबतच कृषी जोडणीसाठी प्रति युनिट 10 आणि 15 पैसे तसेच उद्योगांना प्रति युनिट वीस पैसे जास्त द्यावे लागणार आहेत.

घरगुती ग्राहकांवर काय परिणाम होईल?   

श्रेणी अतिरिक्त शुल्क (युनिट) (प्रति युनिट/पैसे) बीपीएल ५ १ ते १०० १५ १०१ ते ३०० २५ ३०१ ते ५०० ३५ ५०० च्या वर ३५

अतिरिक्त वीज खरेदी महावितरणला एप्रिल व मे महिन्यात अल्पकालीन करार आणि पॉवर एक्सचेंजद्वारे १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली होती. 

Leave a Comment