Girls Scholarship : आता मुलींनाना मिळणार 1000 रुपये शिष्यवृत्ती!

Girls Scholarship  : महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाने असो मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी,आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देत असते.वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करत असते.

ज्या मध्ये मोफत पाठ्यपुस्तक योजना पोषण आहार योजना,अस्वच्छ व्यवसाय योजना यासारख्या अनेक योजना राबविण्यात येत असतात.अशाच विद्यार्थींनी साठी एक योजना सुरू आहे.ज्याद्वारे मुलींना 1000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.त्याविषयी पाहूया सविस्तर माहिती.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर,1996 पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेच्या अटी

  • विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.
  • विद्यार्थीनी इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणारी असावी.
    उत्पन्न व गुणाची अट नाही.
  • संबंधित शाळेच्या मुख्याद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
  • 75% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
  • लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी.
  • सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ऑनलाईन जमा करण्याषत येते.
हे पण पहा --  Scholarship For Girls : सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना! पहा या योजनेचे स्वरूप ...

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती व इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणारऱ्या अनुसूचित जाती,जमाती व भटक्या जमातीच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन 1996 व 2003 पासून सावित्रीबाई फुले  शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातीत कोणत्याही जिल्हा परिषद,स्थानिक स्वराज्य संस्थेततील किंवा अनुदानित शाळेतील 5 वी ते 7 वी दरमहा रु. 60/- प्रमाणे रु.600/- एकूण 10 महिने 8 वी ते 10 वी दरमहा रु.100/- प्रमाणे रु.1000/- एकूण 10 महिने याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.

Savitribai Phule Scholarship Online Form

सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावेत.

Leave a Comment