New Cotton spray : मित्रांनो आज संप्टेंबर महिण्यातील सर्वपित्री अमावस्या आहे. या दिवशी कपाशीवर फवारणी करावी लागते.सध्यस्थितीत कपाशीला पाते आणि बोंडे लागण्यास सुरूवात झालेली असून पातेगळ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.आता कपाशीची ही पातेगळ होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय करणे आवश्यक असते.
kapus pachavi favarni
मित्रांनो कपाशी वर आता फवारणीसाठी महागडी औषधे वापरायची ची गरज नाही,खालील सांगितलेली औषधी ही कमी किमतीची असून जबरदस्त रिझल्ट देणारी आहेत.खालील औषधांची फवारणी केल्यास थ्रिप्स,पांढरी माशी, मावा,तुडतुडे अशा रस शोषणाऱ्या किडींवरती आणि इतर किडींवरती नियंत्रण होईल.यासोबतच पानांची फुलांची चांगली वाढ होऊन कपाशीच्या झाडावर भरपूर पाने – फुले लागतील.
कपाशीवर जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आला खालील कोणतेही एक रसायन असलेले औषधाचा वापरू करु शकता.पांढरी माशी,मावा,तुडतुडे थ्रीप्स यांचा प्रभाव कमी करण्यासाठी किटकनाशक वापरावी.तसेच कपाशीच्या झाडाची वाढ काही दिवस थांबवण्यासाठी,पाते लागण्यासाठी,पते गळ थांबवण्यासाठी एक टॉनिक वापरावे.या बरोबरच एका बुरशी नाटकाचा सामावेश करावा.
कपाशी पाचवी फवारणी
कीटकनाशक औषध प्रमाण : 20 लिटर पंपासाठी
• वाढ रोधक संजीवनी – दापोली किंवा चमत्कार किंवा लियोसिन (25 ग्रॅम)
•• विद्राव्य खत – 13:0:45 किंवा 13:40 :13
•• बुरशीनाशक – साफ/ अवतार (40 ग्रॅम)
•• सिलिकॉन बेस -स्टिकर्स
•• किटकनाशक – प्रोफेक्स सुपर किंवा रोगर किंवा उलाला किंवा पोलो
बोंडअळी रोखण्यासाठी खालील फवारणी करावी
पिकात बोंडअळी आणि पातेगळ होत असेल तर वेळेवर फवारणी घेणे गरजेचे असते.त्यासाठी किटकनाशक/बुरशीनाशक/ विद्राव्य खते याच्या सोबतच खाली दिलेल्यापैकी एका औषधाची फवारणी घ्यावी.कपाशीवर अमेरिकन बॉण्डअळी (हिरवी बॉण्डअळी),ठिपकेदार बोण्डअळी किंवा गुलाबी बॉण्ड अळी असेल तर Thiodicarb 75 WP किंवा Quinalphos 20 AF 20 घटक असलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी.
(1) बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स 3-4 (ml) बोरॉन 20% (25 30 ग्रॅम)
(2) पिकाची वाढ जर 4 फुटापर्यंत झाली असेल तर घरडा केमिकल कंपनीचे चमत्कार याची (PGR) फवारणी घ्यावी
असे केल्यास याचा चांगला रिजल्ट आपल्याला दिसून येईल. यामुळे पातेगळ होणार नाही आणि महत्वाचे म्हणजे यामुळे नवीन पाते लागण्यास देखील सुरुवात होते..
Insecticide Spray of Cotton
टीप- सल्फर व कॉपर एकत्र किंवा दुसऱ्या कीटकनाशकांसबोत वापरू नका. इतर सर्वांचा वापर सुद्धा तपासणी केल्यानंतरच फवारणी करावी,द्रावण घट्ट झाल्यास फाटल्यास योग्य मिश्रण न झाल्यास न विरघळल्यास फवारू नका.एखादा घटक अयोग्य असल्याने असे होऊ शकते.