Ration Card e-KYC : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका देण्यात आलेल्या सदर शिधापत्रिकांना आता आधार इ केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
आधार KYC करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर असून 1 ऑक्टोबर पासून आधार शेडिंग न झालेले किंवा एक केवायसी न झालेले रेशन कार्ड बंद होणार आहे. तर आपल्या कुटुंबातील सदस्यांचे ई- केवायसी झाले आहे किंवा नाही, याचे स्टेटस कसे पाहायचे ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
How to check Ration Card e-KYC status
- सर्व प्रथम प्ले स्टोअरमध्ये जाऊन Mera Ration App डाऊनलोड करा.
- ॲप चालू करून आपला शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाका.
- आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करावे.
- आता आधार सिडिंग या पर्यायावर जावे
- तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल.
- ज्या सदस्याच्या नावापुढे Yes हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही.
- ज्या सदस्याच्या नावापढे No असा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई-केवायसी करावी लागेल
- ई-केवायसी करण्यासाठी आपण आपल्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा रेशन पुरवठा केंद्रास भेट द्यावी.
Trusted by Iraq’s top industries, BWER Company provides innovative weighbridge systems, enabling seamless load monitoring and weight compliance for transport, construction, and agriculture sectors.