Close Visit Mhshetkari

Maharashtra Rain : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट कायम ! राज्यात  जिल्ह्यात विजांच्या अवकाळी पावसाची पुन्हा.. शक्यता

Maharashtra Rain : नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपल्याला राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाचे सावट अजून तरी गेलेले नाही.

आपण अनुभवलेच की नोव्हेंबर महिन्यात मुसळधार पाऊस व चक्रीवादळ आले आणि काही भागात गारपीट देखील झाली.

यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व पीक हे भुईसपाट पडले. झालेल्या पावसामुळे पिकाची नासाडी होऊन पिकावर कीटकांचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला.

lMD weather forecast 

अशा परिस्थितीत पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाबद्दल महत्त्वाची बातमी दिली. पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याने माहिती दिली.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉंग या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात आगामी पाऊस बरसण्याची दाट शक्यता असणार आहे. दि.8 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता असणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

हे पण पहा --  Maharashtra Rain : पावसाचा मुक्काम वाढला; राज्यात पुढील काही दिवसात संततधार

Rain Update Maharashtra

IMD ने पूर्व विदर्भात विजांसह जोरदार पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे.पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे तसेच मराठवाड्यात तुरळक विजासह पावसाची दाट शक्यता हवामान विभागाकडून मिळाली.

पुन्हा एकदा हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे नैऋत्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्रीवादळ स्थिती तयार झाली तसेच बंगालच्या उपसागरात मिंचांग चक्रीवादळ सुद्धा तयार झाले.

यामुळे किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली. अनेक राज्यांमध्ये वादळी पावसाप्रमाणे अनेक राज्यात वादळी पाऊस झाला आहे आणि यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सध्या राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. दिनांक 8 डिसेंबरपासून राज्यात पूर्णपणे वातावरण स्वच्छ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची आणि पशुधनाची काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment