Sanjay Gandhi Niradhar : निराधारांची दिवाळी होणार गोड!; अनुदानात वाढ, आता १५०० प्रति महिना मिळणार

Sanjay Gandhi Niradhar : तीन महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निराधारांसाठी आता गोड बातमी आली असून त्यांची दिवाळी ‘प्रकाशमय’ होणार आहे.पात्र लाभार्थ्याना आतापर्यंत १ हजार रुपयांचे अनुदान मिळत होते. परंतु आता आता केंद्र व राज्य शासनामार्फत १५०० रुपये दरमहा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

संजय गांधी निराधार योजना

मित्रांनो नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संजय गांधी निराधार योजना व ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजने संदर्भात अनुदानाची शिफारस व निधी वाटप करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी या सर्व लाभार्थ्यांना थकीत सहज चालू महिन्यातील अनुदान प्राप्त होणार आहे.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपल्या गावातील बहुतांश व्यक्तींना सदरील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मिळत असते.त्या पेन्शनचा लाभार्थी असल्यासाठी काही अटी व पात्रता पूर्ण कराव्या लागतात. साधारणपणे खालील लाभार्थी हे संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट आहे. या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव तसेच २१ हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.

निराधार योजना लाभार्थी

  • निराधार पुरुष, महिला तसेच अनाथ मुले
    दिव्यांगातील सर्व प्रवर्ग
  • क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोगसारख्या आजार
  • स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला
  • निराधार, विधवा, घटस्फोटित, तसेच पोटगी न मिळालेल्या महिला
  • तृतीयपंथी, देवदासी
  • ३५ वर्षावरील अविवाहित महिला
  • तुरुंगात शिक्षा भोगलेल्या कैद्यांची पत्नी
  • सिकलसेलग्रस्त

संजय गांधी निराधार योजना ऑनलाइन अर्ज व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

संजय गांधी निराधार योजना

Leave a Comment