Close Visit Mhshetkari

Ferfar utara : जुने फेरफार उतारा व सातबारा खाते पहा ऑनलाईन आपल्या मोबाईलवर

Ferfar utara : तुम्हाला कुठल्याही कारणास्तव जुने सातबारा (old 7/12 utara) आणि जुने फेरफार हि कागद पत्रे हवी असल्यास तुम्ही हि कशी प्राप्त करू शकता ? 1880 सालापासूनचे जुने फेरफार उतारे सातबारा, खाते आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कसे पहायचे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. यामुळे तुम्ही हा लेख संपुर्ण नक्की वाचा.

old land record
old land record

Ferfar utara online

सातबारा फेरफार उतारे, खाते उतारे ऑनलाईन माहिती सुरुवातीला सरकारने हीच माहिती फक्त 7 जिल्ह्यां पुरती मर्यादित केली होती.परंतु आता 19 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा ऑनलाइन फेरफार उतारा सातबारा,खाते पाहता येणार आहेत कधी-कधी आपल्या कडून जमिनीची जुनी कागदपत्रे हरवून जाता किंवा ती खूप जुनी असल्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळून ठेवणे खूप कठीण होऊन जाते व ती खराब होऊन जाते.

जमिनीची सर्व रेकॉर्डस् हे शासनाने सांभाळून ठेवलेले असते. भलेही ही कागदपत्रे कितीही जुनी असुद्या ती वर्षवार नुसार एका क्रमाने शासनाने जपून ठेवलेली असतात. तसेच वेळोवेळी ते कागदपत्रांवर औषधांची फवारणी करतात. जर का तुम्हाला तुमच्या परिवारा कडे पूर्वी किती जमीन होती किंवा जुना ७/१२ आणि जुने फेरफार तुम्हाला बघायचे असल्यास तुम्ही ते बघु शकता.

फेरफार सातबारा (Old Mutation)

महाराष्ट्र शासनाने सर्व जुने 7/12 आणि फेरफार पाहण्यासाठी Aaple Abhilekh हे ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहे.याठिकाणी तुम्ही जमिनीचे 1880 सालापासूनचे जुने फेरफार उतारे सातबारा, खाते आपल्या मोबाईल वर ऑनलाईन हे जुने रेकॉर्डस् ऑनलाइन बघू शकता.”1880 सालापासूनचे फेरफार सातबारा

जर का काही कारणास्तव तुमचे जुने ७/१२ आणि जुने फेरफार या पोर्टल वर उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या भूमि अभिलेख कार्यालयात जाऊन जमिनीच्या जुन्या कागद पत्रांसाठी अर्ज करा.पण ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला जुने रेकॉर्डस् मिळायला वेळ लागतो कारण कागदपत्रे शोधून ती द्यावी लागतात.

हे पण पहा --  Satbara Utara : सातबारा उतारा डुप्लिकेट असू शकतो ? डुबलीकेट सातबारा कसा ओळखायचा घ्या जाणून माहिती..

How to get old 7/12 Utara online

>> सर्व प्रथम कोणत्याही वेब ब्राउझर मध्ये Aaple Abhilekh असे टाईप करून सर्च करा. त्यानंतर Aaple Abhilekhe पोर्टल ओपन होईल.

>> Aaple Abhilekh या पोर्टल वर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता आणि लॉगिन ची माहिती देऊन Registration करून Login करून घ्यावे.

>> यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.

पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे.यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.

>> आता मी फेरफार उतारा निवडला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.

>> त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

>> त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.

>> फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.

>> उदाहरणार्थ समजा मला 1982मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं आहे.

>> search या बटनावर क्लिक करा.Download Available Files या बटनावर क्लिक करा.

>> भरलेल्या माहिती नुसार तुमच्या स्क्रीन वर काही search results येतील त्यात तुम्हाला जुने 7/12 आणि फेरफार नंबर year wise दिसतील,त्यात तुम्हाला जे हवे त्याला Add to Cart करा.

>> शेवटी Cart मध्ये जाऊन ती file open करा आणि तुमचा जुना 7/12 किंवा जुने फेरफार उतारा बघा.तुम्ही या फाईलची print सुद्धा काढू शकता.

Leave a Comment