Crop insurance : राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ४८(२) अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) वी स्थापना करण्यात आली आहे.
अतिवृष्टी नुसकान भरपाई २०२४
सादरिल निधीमध्ये केंद्र शासनाकडून ७५ टक्के व राज्य शासनाकडून २५ टक्के या प्रमाणे अंशदान दिले जाते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे (हिमवर्षाव), ढगफुटी टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या १२ नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुज्ञेय आहे.
नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रीमंडळाने दि.१९.१२.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेला आहे.
Ativrushti nuskan bharpai yadi
सदरील निर्णयास अनुसरुन, नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
मदतीचे वाढीव दर
१) जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत – रू.१३,६००/- प्रति हेक्टर, ३ हेक्टरच्या मर्यादत
२) बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत – रु.२२,५००/- प्रति हेक्टर, २ हेक्टरच्या मर्यादत
३) बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत – रु.३६,०००/- प्रति हेक्टर, ३ हेक्टरच्या मर्यादेत
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात येणार आहे.
मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेतीपिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे.
सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांकः ४१०/२०२३/व्यय-९. दिनांक २६.१२.२०२३ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे.