7th Pay Commission : मित्रांनो राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय Good news महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता 24 ऑक्टोबर रोजी राज्यात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे.पण विविध राज्यातील कर्मचाऱ्यांना आत्ताच दिवाळी गिफ्ट मिळत आहे.
महागाई भत्ता वाढ 38%
दिवाळी सणाच्या अगोदर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी विविध सरकारकडून महागाई भत्ता 38% ( DA hike) वाढ करुन दिवाळी गिफ्ट देण्यात आले आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला वेतनामध्ये मोठी भर पडणार असल्याने,मोठा आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
दिवाळी सणाला राज्य कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 % महागाई भत्ता वाढ करुन सरकारकडुन कर्मचाऱ्यांना खुश करण्यात येत आहे.यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी चांदी झाली आहे .पण मित्रांनो ही वाढ महाराष्ट्र राज्य सरकारने नाही तर दिल्ली सरकारने लागू केली आहे .
DA Hike updates of government employees
दिवाळीच्या आधी राज्यसरकारी कर्मचाऱ्यांची चांदी झाली आहे पण ती महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत.दिल्ली सरकारच्या (बैठकीत डीएम्हणजेच महागाई भत्ता 4 % वाढवण्यात आला आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली एका समितीने हा निर्णय घेतला.
दिल्ली राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही खास दिवाळी भेट देण्यासंबंधीचा आदेश आज जारी करण्यात आला आहे. या अधिकृत आदेशानुसार केंद्राकडून निर्धारित दरांनुसार महागाई भत्त्यात 38 % प्रमाणे वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठवला.
4 % DA hike of central employees
मागच्या महिन्यात 28 सप्टेंबर रोजी केंद्रात कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी कर्मचारी आणि पेंशनर्सच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करून महागाई भत्ता 38% करण्याची घोषणा करण्यात आली होती.