Soyabean Production : सोयाबीनमध्ये ५५ ते ७८ टक्क्यांपर्यंत घट! २५% विमा देण्याचे निर्देश

Soyabean production : खरीप हंगामात महाराष्ट्रातील सोयाबीनच्या उत्पादनात जवळपास ५५ ते ७८ % पर्यंत घट होण्याची शक्यता आहे.खरीप हंगाम २०२४ मध्ये एकट्या लातूर जिल्ह्यातील सर्व ६० मंडळात सोयाबीनच्या उत्पादनात ५५ ते ७८ टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे.

Soybean crop insurance

मराठवाड्यातील विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांनी पिक विमा परतावा संदर्भातील नियमानुसार २५ % अग्रिम देण्यासाठी जिल्ह्यातील एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला निर्देश दिलेले आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाचा खंड मुळे संकटाचे ढग गडद झाले आहेत.जिल्ह्यात पावसाची दांडी असल्याने हलक्या,मध्यम जमिनीतील सोयाबीनचे प्रमुख व इतरही पिके गेल्यात जमा आहे.

पंतप्रधान पिक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय संयुक्त समिती अध्यक्ष म्हणून पिक विमा परतावा नियमातील संदर्भाचा अहवाल देत शेतकऱ्यांना २५ % अग्रिम मत देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले आहेत.

Soybean Yellow Mosaic

जालना,परभणी,हिंगोली,लातूर,संभाजीनगर तसेच विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यातील सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी सोयाबीन पिकाच्या मागील 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० % पेक्षा कमी उत्पादन यंदा अपेक्षित असल्याने शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. जवळपास अपवाद वगळता सर्वच मंडळात ६० ते ७८ % पर्यंत सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार स्पष्ट आहे.

हे पण पहा --  Health Insurance : खुशखबर ... आता 65 वर्षांवरील लोकांना पण खरेदी करता येणार आरोग्य विमा पॉलिसी ! जाणून घ्या नवीन नियम ..

SBI General insurance company यांनी अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन व अधिसूचित पिकांकरिता सर्व साठ मंडळातील सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच पिक विमा धारक शेतकरी बांधवांना पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील असे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment