Holidays list : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन 2023 सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.2023 मध्ये एकूण 25 सार्वजनिक सुट्ट्या,8 वेळा शनिवार किंवा रविवार असणार आहे.सुट्टयांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Public holidays of 2023
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८ – जेयूडीएल / तोन,दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले होते,त्या अधिकाराच्या वापर करून,महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2023 सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर केल्या आहेत.
- प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी (गुरुवार)
- महाशिवरात्री १८ फेब्रुवारी (शनिवार)
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी (रविवार)
- होळी (दुसरा दिवस) ७ मार्च (मंगळवार)
- गुढीपाडवा २२ मार्च (बुधवार)
- रामनवमी ३० मार्च (गुरुवार)
- महावीर जयंती ४ एप्रिल (मंगळवार)
- गुड फ्रायडे ७ एप्रिल (शुक्रवार)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (शुक्रवार)
- महाराष्ट्र दिन १ मे (सोमवार)
- बुद्ध पौर्णिमा ५ मे (शुक्रवार)
- बकरी ईद (ईद उल झुआ)२८ जून (बुधवार)
Public holidays of 2023 Maharashtra
- मोहरम २९ जुलै (शनिवार)
- स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट (मंगळवार)
- पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट (बुधवार)
- गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर (मंगळवार)
- ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर (गुरुवार)
- महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर (सोमवार)
- दसरा २४ ऑक्टोबर (मंगळवार)
- दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर (रविवार)
- दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर (मंगळवार)
- गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर (सोमवार)
- ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सुट्टीच्या दिवशी येणारे सण
- 18 फेब्रुवारी 2023, महाशिवरात्री (शनिवार) :- 2023 मध्ये महाशिवरात्रीचा सण (Makar Sankranti 2023 Date) शनिवारी येत आहे.या सणाची सुट्टी वेगळी मिळणार नाही.मात्र ज्यांना फक्त रविवारची सुट्टी मिळते,त्यांना याचा फायदा होणार आहे.
- 22 एप्रिल 2023, ईद-उल-फित्र (शनिवार) :- नवीन वर्षाच्या कॅलेंडरनुसार ईद 22 एप्रिलला आहे.या दिवशीही शनिवार असल्याने ज्या लोकांना पाच दिवसांचा आठवडा,त्याची ती सुट्टी वाया जाणार आहे.
- 12 नोव्हेंबर 2023, दिवाळी (रविवार) :- यंदाच्या मोठ्या सणांपैकी एक असलेला दिवाळी (Diwali 2023 Date) यंदाही रविवारी येत आहे.
- 19 नोव्हेंबर 2023, छठ पूजा (रविवार) :- उत्तर भारतीयांसाठी मोठा सण असलेला छठपूजाही यंदा रविवारी आहे.अशा प्रकारे आणखी एक मोठी सुट्टी वाया जाईल.
- 28 सप्टेंबरला 2023 :- अनंत चतुर्दशी वर्षी दहीहंडी (Dahi Handi 2023) आणि अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi 2023) दिवशी सुट्टी असणार आहे. पण 2023 साली मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्टी असते आणि याच दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी घोषित करण्यात आली आहे.