SSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर करण्यात आला आहे.आज दुपारी एक वाजल्यापासून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येत आहे.
SSC Board Exam Result
शिक्षण मंडळाने राज्यातील एकूण 9 विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये ही परीक्षा घेतली होती.आपल्याला खालील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल पाहता येणार आहे.
इयत्ता दहावीचा निकाल कधी? या प्रश्नावर बोलताना 27 मे रोजी पर्यंत दहावीचा निकाल लागेल अशी माहिती शिक्षण मंत्री केसरकर यांनी दिली होती.
सदरील निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर निकाल पाहता येईल.
सध्या हा निकाल पाहता येत आहे.विद्यार्ध्यांना SMS आणि Digi Locker च्या मदतीने सुध्दा निकाल पाहता येईल.