Close Visit Mhshetkari

UPI Cash Deposit : आता UPI च्या माध्यमातून ATM मध्ये जमा करता येईल पैसे; कसे आणि केव्हा होणार लाँच

UPI Cash Deposit : नमस्कार मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्ति कांत दास यांनी नुकतीच यूपीआय पेमेंट म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरसेप संदर्भात एक मोठी घोषणा केलेली आहे. शक्तिकांत दास यांच्या दाव्यानुसार कॅश डिपॉझिट सुद्धा ही लवकरच यूपीआय च्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे.

UPI Cash Deposit for ATM

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा क्यूआर कोड च्या माध्यमातून आपण दुकान त्याचबरोबर विविध ठिकाणी पेमेंट करत असतो.तसंच ATM मधून पैसे काढण्यासाठी केला जातो. 

आता लवकरच यूपीआय द्वारे कॅच डिपॉझिट मशीन मध्ये पैसे डिपॉझिट करण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे ही सुविधा कधी सुरू होईल या संदर्भात निश्चित तारीख काय आहे याविषयी अजून पर्यंत कोणतेही अपडेट आलेले नाही परंतु त्यांच्या वक्तव्यावरून कृपया अधिक युजर फ्रेंडली करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

कसे जमा होतील पैसे?

UPI कार्डलेस कॅश डिपॉझिट सुविधा UPI कॅश काढण्यासारखीच असणार आहे,याचा अर्थ ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवरून थेट यूपीएशी जोडलेल्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करता येणार आहे. यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड वगैरेची आवश्यकता भासणार नाही.

हे पण पहा --  ATM Cash Withdrawal : एटीएम मधून फाटकी नोट निघाल्यास काय करावं ? फाटलेली नोट बदलून मिळते का ? पहा सविस्तर

आपले पैसे फक्त UPI डिटेल्समधूनच जमा केले जाऊ शकतात.सध्या ग्राहक युपीआयच्या माध्यमातून पैसे काढू शकतात. ज्याप्रमाणे आता एटीएम स्क्रीनवर युपीआय द्वारे पैसे काढण्याचा पर्याय दिसतो, त्याचप्रमाणे UPI कॅश डिपॉझिटचा पर्याय दिला जाणार आहे. थोडक्यात आपण क्यू आर कोड स्कॅन करून आपले पैसे एटीएम द्वारे खात्यात जमा करू शकणार आहे.

रिटेल गुंतवणूकदारांसाठी अॅप 

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणखी एक सुविधा जाहीर केली आहे. आरबीआय रिटेल डायरेक्ट अंतर्गत अनेक लॉन्च करण्यात येणार आहे. याद्वारे गुंतवणूकदार थेट आरबीआय कडे सरकारी सिक्युरिटी मध्ये सहज गुंतवणूक करू शकणार आहे. आणि आपण आरबीआय पोर्टल द्वारे सरकारी सेक्युरिटी मध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी खातं उघडू शकणार आहात.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment