Close Visit Mhshetkari

SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी क्रेडिट कार्ड ग्राहकांना झटका; 1 एप्रिलपासून लागू होणार हा नियम ..

SBI Bank : SBI ने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI ने आपल्या कोट्यवधी क्रेडिट कार्ड गधारकांना धक्का दिला आहे. आता SBI कार्डने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. सदरील नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील.

SBI Credit Card Reward Point

सदरील नवीन नियमानुसार, SBI क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट केल्यावर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत. दिनांक 1 एप्रिलपासून ठराविक क्रेडिट कार्डांसाठी हा नियम लागू होणार आहे,तर 15 एप्रिल 2024 पासून उर्वरित कार्ड्सवर लागू होईल.

आता 1 एप्रिल 2024 पासून खालील SBI कार्डांद्वारे रेंट पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

  • ऑरम एसबीआय कार्ड
  • एलाईट एसबीआय कार्ड
  • एलाईट अॅडव्हान्टेज एसबीआय कार्ड
  • पल्स एसबीआय कार्ड
  • सिंप्ली क्लिक अॅडव्हान्टेज कार्ड
  • एसबीआय कार्ड प्राइम ॲडव्हांटेज
  • एसबीआय कार्ड प्लॅटिनम
  • एसबीआय कार्ड प्राइम प्रो
  • एसबीआय कार्ड शौर्य सिलेक्ट
  • एसबीआय कार्ड प्लॅटिनम ॲडव्हान्टेज
  • डॉक्टर एसबीआय कार्ड
  • गोल्ड एसबीआय कार्ड
  • गोल्ड क्लासिक एसबीआय कार्ड
  • गोल्ड डिफेन्स एसबीआय कार्ड
  • कर्नाटक बँक एसबीआय कार्ड 
  • अलाहाबाद बँक एसबीआय कार्ड
हे पण पहा --  Credit Card : क्रेडिट कार्डचे महत्त्वाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे का? घ्या जाणून सविस्तर..

15 एप्रिल 2024 पासून खालील SBI कार्डांद्वारे रेंट पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

  • एअर इंडिया प्लॅटिनम कार्ड
  • एअर इंडिया सिग्नेचर कार्ड
  • आदित्य बिर्ला एसबीआय कार्ड
  • बीपीसीएल एसबीआय कार्ड
  • आयआरसीटीसी एसबीआय कार्ड
  • फॅब इंडिया एसबीआय कार्ड
  • क्लब विस्तारा एसबीआय कार्ड
  • सेंट्रल एसबीआय कार्ड

थोडक्यात SBI चे असे अनेक काही कार्ड्स आहेत, ज्यावर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून रेंट पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

Leave a Comment