Post office scheme : आयकर सूट मिळण्यासाठी अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या अश्या अनेक योजनांवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर लाभ मिळत नाही.
मित्रांनो बऱ्याच अशा पोस्ट ऑफिस योजना आहे, ज्या 80C अंतर्गत कर सूट श्रेणीत येत नाहीत. ता अनेक अश्या काही योजनांवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर सवलत देण्यात येत नाही.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
भारत सरकारने महिलांसाठी 2023 मध्ये महिला सन्मान प्रमाणपत्र एक लहान बचत योजना आणलेली आहे. भारतीय महिलांमध्ये पैसे वाचवण्याची आणि गुंतवणूक करण्याची सवय लावणाऱ्या या योजनेअंतर्गत कर लाभ मिळत नाहीत. तुम्ही 80C अंतर्गत कर सूट घेऊ शकता.परंतु व्याज करपात्र आहे.
National Savings Time Deposit
नेशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट योजनेत एक ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. आपण याचा कालावधी देखील वाढवू शकतो. साधारणपणे 1 वर्ष, 2 वर्षे आणि 3 वर्षांसाठी दिलेले व्याजदर अनुक्रमे 6.9 %, 7.0 % आणि 7.1 % आहे. आपण नॅशनल सेव्हिंग्ज टाइम डिपॉझिटमध्ये 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर कर लाभ घेऊ शकता, परंतू 80C एक वर्ष ते तीन वर्षांच्या ठेवींवर कर सवलत उपलब्ध नसते.
राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव (RD)
RD योजनेत पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असून 6.7 % व्याज मिळते.आरडी खातेधारकाला एका महिन्यात किमान 100 रुपये किंवा 10 रुपयांच्या पटीत जमा करणे आवश्यक आहे. कमाल ठेवीवर मर्यादा नसते.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
सदरील योजनेत एक व्यक्ती जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकते. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. सदरील योजनेतील मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो.पोस्टाच्या मासिक उत्पन्न या योजनेवर 80C अंतर्गत कोणतीही सूट नाही.
साधारणपणे एका आर्थिक वर्षात 40 हजार रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास व्याज उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या श्रेणीत येते.
किसान विकास पत्र योजना
KVP योजनेत 80C अंतर्गत कोणतीही सूट नाही. यावर मिळणाऱ्या परतव्या वर पण कर भरावा लागतो.सदरील योजनेत दरवर्षी व्याज मिळते.