Pink bollworm : कपाशीवर गुलाबी बोंडअळी ? आत्ताच करा हे सोपे उपाय नाही पीक हातातून जाईल…

Pink bollworm : ज्याठिकाणी कपाशी ची वेळेवर लागवड झालीय अशा ठिकाणी कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत आहेत. अशा ठकाणी ढगाळ वातावरणामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग दिसतात.यातील मादी पतंग कपाशीचे पाते,फुले,बोंडे यावर अंडी घालतात. त्यामुळे पुढील काळात कपाशीत गुलाबी बोंडअळीचा पार्दुरभाव वाढू शकतो.

कपाशी वरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जर टाळायचा असेल तर काय कराल?तर यावर सोपा उपाय म्हणजे कपाशीचे नीट निरीक्षण करुन गुलाबी बोंडअळी असलेल्या डोमकळ्या तोडाव्यात. या डोमकळ्या जाळून किंवा जमिनीत पुरून नष्ट करावेत.

गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात कपाशीच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावा.जर जास्त प्रमाणात पतंग असतील तर यासाठी आपल्याला सापळ्याची एकरी संख्या वाढवावी लागेल म्हणजे एक एकर क्षेत्रात ८ ते १० कामगंध सापळे लावावेत.

Pink Bolleworn on cotton

गुलाबी बोंडअळीचा प्रभाव कमी करण्यासाठी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाचे ट्रायकोकार्ड एकरी २-३ या प्रमाणात लावावे. पण ट्रायकोकार्ड पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावायचे आहे. ट्रायकोकार्ड शेतामध्ये लावल्यानंतर कमीत कमी १० दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची नाही,कारण किटकनाशकामुळे ट्रायकोग्रामा बॅक्ट्री हे परोपजीवी कीटकही नष्ट होतात.

हे पण पहा --  कपाशीला खताचा तिसरा डोस केव्हा व कोणता द्यावा ? Cotton fertilizer dose

बोंडअळीला रोखण्याचा तीसरा सोपा उपाय म्हणजे पक्षीथांबे लावावे.आपल्याला कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे लावाचेत.या थांब्यावर पक्षी बसून शेतातील आळ्या खातील.

कपाशी किटकनाशक फवारणी

कृषी तज्ञांच्या मते गुलाबी बोंड आळी वर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी पोळ्याच्या आमावस्येच्या आसपास अंडीनाशक औषधी प्रोफेनोफॉस (क्यूराक्रॉन किंवा प्रोफेक्स) फवारणी करावी.यामुळे गुलाबी बोंड अळीचा अंड्यातचं नायनाट होतं असल्याचा दावा केला जातो.

बियाण्यांवर ॲल्युमिनियम फॉस्फाईडची प्रक्रिया करा.क्लोरपायरीफॉस 20 ईसी किंवा एंडोसल्फान 35 ईसी किंवा ट्रायझोफॉस 40 ईसी (2.5 लि/हे )यांसारख्या कीटकनाशकांचा वापर करावा.

शेतकरी मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते,कापसाचे पीक 60-70 दिवसांचे झाल्यावर बोंडआळीची पुढची पिढी पुन्हा जोमाने हल्ला करण्यास तयार होते, त्यावेळी देखील या औषधाची दुसरी फवारणी करावी.

Leave a Comment