Close Visit Mhshetkari

RTE Admission : आरटीई प्रवेशा संदर्भात महत्त्वाची अपडेटस् ! आता या दिवशी होणार विद्यार्थी नोंदणी ..

RTE Admission : नमस्कार मित्रांनो शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई प्रवेशांतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी शिक्षण विभागाने RTE प्रवेश प्रक्रियेत यावर्षी काही बदल केले आहे. आणि या बदलामुळे आरटी च्या प्रवेशामध्ये जागा वाढल्या आहे. आर टी ई प्रवेशासाठी 5 एप्रिल नंतर नोंदणी सुरू होणार आहे.

RTE Admission 2024

श्री.शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश, शाळा नोंदणीबाबत

विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई,शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व,शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, मनपा/नपा सर्व यांना परिपत्रका द्वारे कळविले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९, सुधारित अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून राज्यातील स्वयंअर्थसहाय्यीत शाळा वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश राखीव ठेवणार नाही तसेच आरटीई २५ टक्के पोर्टलवर शाळा नोदंणी करणार नाही अशी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

तथापि, ज्या शाळा अदयापपर्यत आरटीई पोर्टलवर २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी केलेली नाही अशा शाळांना आपल्या स्तरावरुन सक्त ताकीद देण्यात यावी. आरटीई २५ टक्के पोर्टलवर आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र असणाऱ्या शाळा नोंदणी केलेली नसल्यास त्यास वैयक्तीक आपणास जबाबदार धरण्यात येईल. तसेच शासन निर्णय दिनांक १६.०१.२०१८ मधील तरतूदीनुसार शाळा मान्यता काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येणार आहे.

हे पण पहा --  RTE Admission : आरटीईच्या 25 % राखीव प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी मिळली मुदतवाढ; पहा नवीन तारीख

RTE Admission online Process

शिक्षण हक्क कायदा अंतर्गत आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेतील 50 टक्के आरक्षण जागा प्रवेश दिला जातो. आणि यामध्ये इंग्रजी शाळांचे प्रमाण हे अधिक राहते ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून विद्यार्थ्यांची नोंदणी केल्यानंतर प्रवेश निश्चित केला जात असतो. 2024-25 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून 5 एप्रिल नंतर विद्यार्थी नोंदणी करण्यास सुरुवात होणार.

छ.संभाजीनगर मध्ये 75 हजार 856 शाळा मधील लाख 71 हजार 223 जागा आता प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या असूनही त्या आठवड्यामध्ये 5 एप्रिल नंतर ही विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

सूचना :- विद्यार्थ्यांनी वेळेवर नोंदणी करणे आवश्यक आहे.आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा.
निवड प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी शिक्षण विभागाच्या सूचनांचे पालन करा.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment