Close Visit Mhshetkari

PPF Vs SIP Mutual Fund : गॅरंटीड कमाईवाली PPF की मार्केट लिंक्ड एसआयपी; पहा 15 वर्षात कोणती स्कीम तुम्हाला बनवेल मालामाल ?

PPF Vs SIP Mutual Fund : भविष्याच्या दृष्टीने सुरक्षित गुंतवणूक करणे अतिशय महत्त्वाची असते. बहुतेक लोक लवकर गुंतवणूक सुरू करतात. सध्या विविध क्षेत्राचा विचार करायचा झाल्यास दोन प्रकारची गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरत आहेत. 

एका असा गुंतवणूकदार असतो, ज्याला धोका पत्करायचा नसतो. त्यांना आपले पैसे सुरक्षित असतील आणि खात्रीशीर परतावा मिळेल अशा ठिकाणीच गुंतवणूक करायला आवडते.तर दुसरा गुंतवणूकदार असा असतो,जो जोखीम पत्करून अधिक परतावा मिळवण्यास तयार असतो.

आज आपण अशा दोन महत्वपूर्ण गुंतवणुकी विषयी माहिती बघणार आहोत ज्याद्वारे सुरक्षित आणि भरपूर फरसावा कसा मिळेल त्याचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे.

PPF Vs SIP Mutual Fund Investment

पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) आणि एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) हे दोन्ही भारतातील लोकप्रिय बचत आणि गुंतवणूक पर्याय आहेत.दोन्ही योजनांमध्ये अनेक फायदे आणि तोटे आहेत, त्यामुळे तुमच्यासाठी कोणती योजना योग्य आहे हे ठरवणे महत्वाचे आहे.

पीपीएफ ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे जी सरकार पुरवते. एसआयपी हे म्युच्युअल फंड किंवा इतर इक्विटी-आधारित गुंतवणुकीमध्ये नियमितपणे छोटी रक्कम गुंतवण्याची योजना आहे.पीपीएफ आणि एसआयपी मधील काही प्रमुख फरक खालीलप्रमाणे आहेत.

हे पण पहा --  FD Interest Rates : खुशखबर ! 'या' 4 बँका देत आहेत एफडीवर 9 % व्याज; पहा संपूर्ण यादी ...

Systematic Investment Plan

  • किमान गुंतवणूक : ₹100 ते ₹500 पासून सुरू
  • कमाल जास्तीत जास्त गुंतवणूक : कोणतीही मर्यादा नाही
  • परिपक्वता कालावधी : निश्चित नाही,आपण आपल्या गरजेनुसार ते कमी किंवा जास्त कालावधीसाठी चालवू शकता.
  • लवचिकता : तुम्ही ते कधीही थांबवू किंवा बंद करू शकता.
  • चक्रवाढी लाभ : गुंतवणुकीवर चक्रवाढीचा लाभ मिळतो. एसआयपी जितकी जास्त असेल तितका चक्रवाढीचा फायदा जास्त.
  • उदाहरण : दरमहा ₹5000 गुंतवल्यास, 15 वर्षांत 12% च्या दराने ₹16,22,880 परतावा मिळेल

Public Provident Fund

  • किमान गुंतवणूक : ₹500 प्रति महिना
  • कमाल गुंतवणूक : ₹1.5 लाख प्रति वर्ष
  • परिपक्वता कालावधी : 15 वर्षे
  • लवचिकता : कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढता येत नाहीत. 
  • आयकर लाभ : EEE (Exempt-Exempt-Exempt) कर लाभ मिळतो.
  • उदाहरण : दरमहा ₹5000 गुंतवल्यास, 15 वर्षांत 7.1% च्या दराने ₹16,27,284 परतावा मिळेल.

एसआयपी आणि पीपीएफ दोन्ही चांगले गुंतवणुकीचे पर्याय आहेत.एसआयपी अधिक लवचिक आणि चक्रवाढीचा फायदा देते, तर पीपीएफ कर लाभ देते.आपल्या गुंतवणुकीचे ध्येय आणि जोखीम सहनशक्ती नुसार तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता.

Leave a Comment