Close Visit Mhshetkari

PAN Card : पॅनकार्ड मध्ये नाव, पत्ता, जन्म तारीख, मोबाइल नंबर बदलायचा आहे ? जाणून घ्या प्रोसेस

PAN Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आर्थिक व्यवहाराची माहिती करण्यासाठी पॅन कार्ड हा भारतातील एक सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्याशिवाय आपल्याला बँक शेअर मार्केट खरेदी ओळखीचा पुरा म्हणून पॅन कार्ड ची आवश्यकता भासत असते बँक खाते उघडण्यासाठी सुद्धा आपल्याला पॅन कार्डची गरज असते.थोडक्यातअनेक आर्थिक व्यवहारांसाठी हे अनिवार्य आहे. 

अशा परिस्थितीत आपल्या पॅन कार्डवर माहिती चुकीची असल्यास किंवा अस्पष्ट असल्यास यावेळी आपल्याला पॅन कार्ड मुळे नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. अशावेळी आपल्या पॅन कार्ड वरील जन्मतारीख नाव मोबाईल नंबर याची दुरुस्ती आपण ऑनलाइन कशी करावी यासंदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. 

Pan Card Onlile Updates 

  1. NSDL ई-गव्हर्नन्स वेबसाइटद्वारे पॅन अपडेट करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
  2. ई-गव्हर्नन्स https://www.onlineservices.nsdl.com/ या पोर्टलला भेट द्या.
  3. सर्व्हिसेस’ टॅबवर जा आणि ड्रॉपडाउन मेनूमधून ‘पॅन’ निवडा.
  4. ‘PAN डेटामधील करेक्शन्स’ मेन्यू शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि ‘अप्लाय’ हा पर्याय निवडा.
  5. पॅन कार्डमधील बदल / करेक्शन’ टॅब अंतर्गत ‘लागू करण्यासाठी क्लिक करा’.
  6. दस्तऐवज सबमिट करण्याची पद्धत निवडा.आधार आधारित e-KYC च्या साठी आधार क्रमांक टाका आणि OTP टाका.
हे पण पहा --  Aadhar Card rules : पासपोर्ट प्रमाणेच होणार तुमच्या आधार कार्ड चे व्हेरिफिकेशन, सरकार बदलणार आहे नियम !पहा सविस्तर माहिती..

पॅनकार्ड दुरुस्ती कशी करावी ?

  • सर्वप्रथम फॉर्म 49A द्वारे फॉर्म डाउनलोड करा.आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह स्कॅन करून अपलोड करा.
  • तुमचा पॅन क्रमांक एन्टर करा, पॅन कार्ड मोड निवडा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.
  • नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एक टोकन क्रमांक मिळेल. त्यानंतर ओके क्लिक करा.
  • तुमचं नाव आणि पत्ता भरा. त्यानंतर ‘Next Step’ वर क्लिक करा.
  • व्हेरिफिकेशनसाठी तुमचा पॅन क्रमांक एंटर करा आणि ‘नेक्स्ट स्टेप’वर क्लिक करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि नंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

टीप :- पॅन दुरुस्तीसाठी साधारणतः १५ दिवसांचा कालावधी लागतो.तुमचं पॅन कार्ड पोस्टानं पाठवल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक मेसेज मिळेल.

पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल, पासपोर्ट, बँक स्टेटमेंट आणि ड्रायव्हिंग लायसन्स या कागदपत्रांच्या मदतीनं तुम्ही तुमचं पॅन अपडेट करू शकता.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment