Close Visit Mhshetkari

Minor Pan Card : आता आपल्याला लहान मुलांचे सुद्धा काढता येणार पॅन कार्ड ! मिळतात ‘ हे ‘असंख्य फायदे …

Minor Pan Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पॅन कार्ड हा आपल्या भारतीयांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. भारतीय प्राप्तिकर कायद्याच्या कलम 160 नुसार पॅन कार्ड असतात कायम खाते क्रमांक अतिशय महत्त्वाचा असून, सरकारी योजनेचा लाभ घेण्यास पासून, आर्थिक व्यवहार करण्यापर्यंत पॅन कार्डची आवश्यकता भासत असते.

Minor Pan Card Application Process

आपल्याला माहिती असेल की,बँकांशी संबंधित तसेच अन्य आर्थिक व्यवहारासाठी आता पॅन कार्ड करण्यात आले आहे ही केवायसी करणे असो किंवा 50 हजारापेक्षा जास्त व्यवहार करणे असो, पॅन कार्ड आपल्याला सादर करावे लागते. 

अठरा वर्षीय भारतीय व्यक्ती स्वतःच्या नावावरती पॅन कार्ड साठी अर्ज करू शकतो.मुलांचे सुद्धा पॅन कार्ड काढता येते हे आपल्याला माहीत नसेल तर चला आपण बघूया या पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया कशी आहे तसेच याचे असंख्य फायदे काय आहेत.

लहान मुलांच्या नावे पॅन कार्ड काढायचे फायदे

  • मुलांच्या नावावर गुंतवणूक करणे
  • गुंतवणुकीसाठी मुलांना नॉमिनी करायचे असेल तर 
  • मुलांचे बँक खाते उघडण्यासाठी 
  • जेव्हा लहान मुले पैसे कमावत असेल तर

Minor PAN Card – Apply Online

पॅन कार्डसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी सरकारने दोन मार्ग उपलब्ध करून दिले आहेत ,सेवा ऑफलाइन तसेच ऑनलाइन दोन्हीही उपलब्ध आहेत.

  • सर्व प्रथम https://www.onlineservices.nsdl.com/paam/ या वेबसाइटला भेट द्या आणि ” ऑनलाइन पॅन अर्ज ” टॅबवर क्लिक करावे .
  • ड्रॉप-डाउन मेनूमधून योग्य पर्याय निवडा, म्हणजे फॉर्म 49 किंवा फॉर्म 49A , तुमच्या निवासस्थानाच्या स्थितीनुसार.
  • सूचना पाहिल्यानंतर, दिलेल्या ड्रॉप डाउन सूचीमधून अर्जदाराची श्रेणी निवडा आणि “निवडा” वर क्लिक करा.
  • ऑनस्क्रीन दिसणाऱ्या फॉर्ममध्ये विनंती केलेले तपशील भरा.
  • फॉर्मच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे समर्थन देणारी कागदपत्रे अपलोड करा आणि ऑनलाइन प्रक्रिया शुल्क भरा.
  • एकदा फॉर्म भरल्यानंतर, “सबमिट” वर क्लिक करा त्यानंतर एक संदर्भ क्रमांक स्क्रीनवर दिसेल. याचा वापर ॲप्लिकेशनच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • पॅन कार्ड फॉर्ममध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाईल.
हे पण पहा --  Cibil Score : पॅनकार्ड विना आपला सिबिल स्कोअर कसा चेक करायचा ? पहा संपूर्ण प्रोसेस

पॅन कार्ड आवश्यक कागदपत्रे

  1. अल्पवयीन मुलांच्या वतीने त्याचे आई-वडील अर्ज करणार असल्याने त्यांच्या ओळखीचा पुरावा दाखवणारी कागदपत्रे,जसे- आधार कार्ड, मतदान कार्ड आदी
  2. मुलाचे आधार कार्ड 
  3. पत्त्यासाठी वीजबिल किंवा रेशन कार्ड.
  4. मुलाच्या वयाचे प्रमाणपत्र
  5. पालकांचा फोटो इत्यादी 

पॅनकार्ड हे अधिकृत ओळखपत्र असल्याने मुलांच्या ओळखीचा दस्तावेज उपलब्ध होतो. परिणामी बँक खाते उघडणे, पासपोर्टसाठी उपयोग होतो. पालकांनी केलेल्या गुंतवणुकीसाठी मुलांचे नामांकन असेल, तर पॅनकार्ड उपयुक्त ठरते. मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment