Close Visit Mhshetkari

Kadba kutty yojana : कडबा कुट्टी योजना ऑनलाईन अर्ज सुरू, 75% अनुदानासाठी ‘येथे’ करा अर्ज

Kadba kutty yojana : जनावरांची योग्य निघा राखण्यासाठी जनावरांना योग्य खुराक, चारा मिळणे गरजेचे असते.जनावरांच्या आहारासाठी शासनाने गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी अनुदान योजना आणली आहे.याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

Kadba Kutty anudan Scheme

पशुपालन व्यवसायामध्ये कडबा कुट्टी मशीन खूप उपयोगी मशीन आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून कडबा कुट्टी मशीन अनुदानाविषयी नेहमी चौकशी होत असते.सरकार अनुदानावर कडबा कुट्टी मशीन साठी आर्थिक सहाय्य देत असते. तुम्ही जर कडबा कुट्टी मशीन खरेदीच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्या साठी महत्वाचे आहे. कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी 50-75 % पर्यंत अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.

याविषयी सविस्तर माहिती आपण घेत आहोत.कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2022 चालू झाले आहे या योजनेसाठी शेतकऱ्याकडून ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत.महाराष्ट्र सरकार कडबा कुट्टी खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत आहे.या योजनेचे अनुदान 50% किंवा दहा हजार रुपये एवढे आहे.

कडबा कुट्टी मशीन योजना पात्रता

कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत जर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन मिळवायचे असेल तर तुमच्याकडे
खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2. अर्जदार हा ग्रामीण भागात राहणारा असावा.
3. अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
4. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
5. अर्जदाराकडे दहा एकर पेक्षा कमी जमीन असावी लागते

कडबा कुटी मशीन योजना आवशक कागदपत्रे

  • बॅक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  • आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • 8 अ उतारा
  • घराचे वीज बिलाची झेरॉक्स
  • सातबारा
  • कडबा कुटी मशीन चे फायदे कोणते.
  • बारीक कापल्याने जनवरणा खण्यास सोपे जाते .
  • चारा साठवायला कमी जागा लागते .
  • चाऱ्याची नासाडी कमी होते .
  • मोठा चारा कमी वेळेत कापला जातो .
  • कडबा कुटी मशीन ला विद्युत मोटर जोडली चारा
  • कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

>>कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल वर करावा लागतो.
>> सर्व प्रथम शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवर आपले प्रोफाईल बनवावे लागते.
>> येथे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, शेतीची माहिती, पिकाची माहिती द्यावी लागते नंतर अर्ज करता येतो.
>> अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाच्या खरेदीसाठी आर्थिक साहाय्य ही बाब निवडावे.
>> यानंतर मनुष्य चलित अवजारांमध्ये कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करता येतो.
>> लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
>> कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा.
>> जसे हि तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये खालीलप्रमाणे माहिती निवडायची आहे.

Forage grass subsidy scheme 2022

>> तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
>> मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
>> व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नाही.
>> यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा
>> प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.
>> सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व upto 3 असे पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा.
>> या बटनावर क्लिक करा.
>> अशा प्रकारे तुम्ही वरील पद्धतीचा अवलंब करून हा अर्ज करू शकता.

कडबा कुट्टी योजना ऑनलाईन अर्ज करण्याची येथे क्लिक करा – forage gras online forrm

Leave a Comment