Jamin Kayda : देवस्थानाची जमीन नावावर होऊ शकते का ? महाराष्ट्र जमीन कायदा काय सांगतो ? पहा सविस्तर ..….

Jamin Kayda : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आज आपण महाराष्ट्रातील जमीन कायद्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो देवस्थानाच्या जमिनी विषयी आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची आहे.

Land record new rule

तुम्हाला सांगायचे झाल्यास देवस्थानच्या जमिनी या वर्ग तीन मध्ये मोडतात.आणि या जमिनीचा सातबारा उतारा देखील असतो. त्या सातबारावर देवाचेच नाव मालक म्हणून दिलेले असते.

आज आपण देवस्थान जमीन म्हणजे नेमकी कोणती जमीन कोणत्या प्रकारच्या जमिनीला देवस्थानची जमीन म्हणून ओळखले जाते व देवस्थानची जमीन नावावर होऊ शकते का ?याविषयी कायदा काय सांगतो आणि याविषयी कायद्यामध्ये काही तरतूद केली आहे ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

देवस्थानाची जमीन म्हणजे काय ?

म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाल्यास पूर्वीच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम व इतर धर्माच्या देवस्थानासाठी जमीन बक्षीस म्हणून दिली जात असे .आजही शासनाच्या माध्यमातून मंदिर मज्जतीसाठी जमिनी दिल्या जातात राजे महाराजे व शासनाच्या  माध्यमातून देखील मंदिर व मज्जिद साठी जमीन देतात.

हे पण पहा --  Land purchase and sale : जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ऑनलाइन कसे पाहायचे ? घ्या जाणून सविस्तर माहिती

अशा जमिनीला देवस्थानाच्या जमिनी म्हणून ओळखले जात आहे. अशा प्रकारच्या जमिनी या वर वर्ग 3 मध्ये येतात. या जमिनीच्या सातबारा उतारा वर वर्ग तीन असा उल्लेख आढळतो. तसेच देवस्थानच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर देवाचे नाव मालक अथवा कब्जेदार म्हणून लावले जाते.

देवस्थानची जमीन नावावर होऊ शकते का ?

जमीन कायद्यानुसार देवस्थान जमिनीचे हस्तांतरण विक्री व वाटप होऊ शकत नाही. असं स्पष्टपणे कायद्यानुसार सांगितले जाते. परंतु काही अपवाद परिस्थितीमध्ये शासनाच्या पूर्व परवानगीने व धर्मादाय आयुक्त या दोघांच्या परवानगीने अशा जमिनीच्या स्थलांतरण व विक्री केली जाऊ शकते.

देवस्थानची जमीन हस्तांतरण व विक्री होऊ शकत नाही असे नाही. परंतु यासाठी शासनाची पूर्वपरवानगी व धर्मदाय आयुक्त यांची देखील परवानगी आवश्यक असते. आणि यानुसारच जमिनीत अशा जमिनीची खरेदीविक्री होऊ शकते .

1 thought on “Jamin Kayda : देवस्थानाची जमीन नावावर होऊ शकते का ? महाराष्ट्र जमीन कायदा काय सांगतो ? पहा सविस्तर ..….”

Leave a Comment