Close Visit Mhshetkari

Home Loan : गृहकर्ज घेताना लक्षात ठेवा या 5 गोष्टी ! पहा कसा होईल फायदा..

Home Loan : नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमचे घर असावे असे वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते. की आपले घर असावे पण या महागाईच्या युगामध्ये हे आता जराशे कठीणच झाले आहे. या परिस्थितीमध्ये गृहकर्जामुळे ही स्वप्न साकार होण्यास आपली मदत होत असते. पण काही वर्षांमध्ये मालमत्तेच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. त्यामुळे घर घेणे अवघड झाले आहे. बरेचसे लोक गृहकर्जाच्या मदतीने घर घेत असतात.

पण तुम्ही ज्या वेळेस गृह कर्ज घेता त्यावेळी फक्त व्याजच पाहणे काम करता इतर गोष्टी देखील गृह कर्ज घेत असताना लक्षात घेणे आवश्यक राहते. तुम्ही जर पहिल्यांदा गृह कर्ज घेत असाल तर गृहकर्ज विषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर काय आहे ती माहिती पाहूया.

 तुमची आर्थिक स्थिती समजून घ्या 

गृहकर्जाच्या नियमानुसार तुम्हाला आधी डाऊन पेमेंट भरावे लागेल. हे मालमत्तेच्या एकूण किमतीच्या 10 टक्के ते 25 टक्के असते व कर्ज घेतल्यानंतर तुमचा मानसिक हप्ता सुरू होतो. जो दीर्घकाळ चालू राहील. अशा परिस्थितीत तुम्ही जर तुमच्या आर्थिक स्थितीचा चांगला आढावा घेणे आवश्यक राहते. जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही.

 कर्जाची रक्कम निश्चित करा

कर्ज घेण्या अगोदर तुमच्या गरजा व त्याविषयीचे दायित्व लक्षात घेणे आवश्यक राहते. तुम्ही त्या कर्जाचा हप्ता सहज भरू शकता का याचेही तुम्ही गणित ठरवले पाहिजे. व तुम्ही किती रक्कम कर्ज म्हणून घ्यायची हे सुद्धा निश्चित केले पाहिजे. तुम्हाला कर्जाचा नियम सांगायचे झाल्यास तुमच्या पगाराच्या 40% पेक्षा तुमचा इएमआय नसला पाहिजे.

हे पण पहा --  Home Loan : झटपट होम लोन हवं आहे ? मग पटापटा ‘ही’ दोन कामे करा, कमी व्याज दरात मिळेल गृह कर्ज ..

बँकांच्या कर्ज वैशिष्ट्यांची तुलना करा

तुम्ही ज्यावेळी बँकेकडे कर्जासाठी अर्ज करता त्यावेळेस तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे आवश्यक राहते. त्यामुळे तुमची कर्ज मंजुरी होण्यास मदत होते. व क्रेडिट स्कोर सह तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या बँकांची व्याजदर कर्जाची रक्कम, एलटीव्ही प्रमाण, कर्जाचा कालावधी व प्रक्रिया शुल्क यामध्ये काही फरक आहे. का अशा परिस्थितीत गृह कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या कर्जाची वैशिष्ट्यांची तुलना करा व नंतरच कर्जासाठी अर्ज करा.

अधिक डाउन पेमेंट भरा

तुम्ही ज्यावेळी कर्ज घेत असताना त्यावेळी तुमची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल. तर गृह कर्जासाठी तुम्ही डाऊन पेमेंट देऊ शकता. यामुळे कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त राहते.

काही बँका कर्जदारांना कमी व्याजदरात कर्ज देतात जे कमी LTV प्रमाणे उडत असतात. परंतु डाऊन पेमेंट करण्यासाठी तुमचा आपत्कालीन निधी वापरणे तुम्ही टाळायला पाहिजे.

आपत्कालीन निधी ठेवण्याची खात्री करून घ्या 

तुम्ही ज्या वेळेस कर्ज करीत अर्ज करणार असेल तर इमर्जन्सी फोन तुमच्याकडे ठेवला पाहिजे. हे तुमच्या सहा महिन्याच्या एम आय हप्त इतके असले पाहिजे. बऱ्याच वेळा नोकरी गमावल्यामुळे किंवा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे एम आय भरणे कठीण होते. आणि अशा वेळेस तुम्हाला बँक दंड आकारू शकते. व क्रेडिट स्कोर देखील तुमचा खराब होऊ शकतो. त्यावेळी तुम्हाला तुमचा आपत्कालीन निधी उपयुक्त ठरतो.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment