De Mat Accaunt : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी आहे. तुमचे जर शेअर बाजार मध्ये काही व्यवहार करत असाल. आणि तुमचे जर डिमॅट अकाउंट असेल. तर आणि त्या खात्यामध्ये तुमचे व्यवहार चालू नसेल परंतु तुम्हाला त्या खात्यासाठी मेंटेनन्स चार्जेस भरावे लागतात . तर असे खाते तुम्ही चालू ठेवावे की बंद करावे व कशाप्रकारे बंद करावे ? याविषयी आपण सविस्तर माहिती बघूयात.
De Mat Account Maintenance Charges
तुम्ही जर ते डी मार्ट खाते वापरत नसेल तर त्याचे मेंटेनन्स चार्जेस भरण्यापेक्षा ते खाते जर बंद केले तर अधिक फायदा होऊ शकतो.हे खाते कसे बंद करायचे याविषयी आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहूया
तुम्ही जर शेअर बाजारामध्ये व्यवहार करत असेल तर तुमचे डिमॅट खाते असणे आता हे सक्तीचे आहे. बऱ्याच जणांचे एकापेक्षा अधिक डिमॅट खाते असतात आणि तुम्ही जर एखाद्या खात्यामध्ये व्यवहार करत नसाल तर तुम्हाला त्याचे मेंटेनन्स चार्जेस भरावे लागतात. ते मेंटेनन्स चार्जेस भरण्यापेक्षा आपण जर एखादी बंद केले. तर हे अतिशय योग्य ठरते चला तर मग कशाप्रकारे खाते आपण बंद करू शकतो.
डीमॅट खाते बंद कसे करावे?
- सर्व प्रतिभूती विकून टाका किंवा अन्य खात्यात हस्तांतरित करा.
- खात्याचे देणे असल्यास ते भरा.
- डिपॉझिटरी पार्टीसिपंटशी (डीपी) संपर्क साधा.
- खाते बंद करण्याचा अर्ज पूर्ण करा आणि जमा करा.
- अर्जामध्ये खाते बंद करण्याचे कारण द्या.
- आवश्यक कागदपत्रे (पॅनकार्ड, ओळख आणि पत्त्याचा पुरावा) जमा करा.
- डीपी द्वारे कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- खाते बंद करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
- खाते बंद झाल्याची सूचना पत्राद्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाईल.
सूचना : खाते बंद करण्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते.
खाते बंद झाल्यानंतर तुम्ही त्यातून कोणतीही माहिती मिळवू शकणार नाही.