Close Visit Mhshetkari

Bank Holidays : फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

Bank Holidays : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की फेब्रुवारी महिना अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असताना बँके संबंधित अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.

तुम्हाला जर फेब्रुवारी महिन्यात बँकेच्या संदर्भात महत्त्वाचे कामे करायचे असल्यास सर्वप्रथम आपण ही बातमी सविस्तर वाचावी, कारण फेब्रुवारी महिन्यात बँकांना खूप सुट्ट्या असणार आहेत. याची यादी आज आपण पाहणार आहोत. त्यानुसार आपल्या बँका संबंधी नियोजन करण्यास मदत होईल.

Bank Holidays in February 2024

सर्वसामान्य लोकांपासून ते नोकरदार व्यवसाय काय पर्यंत बँक खूप महत्त्वाची वित्तीय संस्था असते.अशावेळी बँका जर बंद राहिल्या तर सर्वसामान्य लोकांना मोठा अडथळा निर्माण होतो. बँक खात्यातून पैसे काढण्यापासून जमा करण्यापर्यंत अनेक कामे अडतात अशावेळी बँकांशी संबंधित सुट्ट्यांची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.

फब्रुवारी 2024 महिन्यांमध्ये तब्बल बँकांना 14 दिवस सुट्टी राहणारा असून यामध्ये विविध सण शनिवार रविवार रोजी असणाऱ्या सुट्ट्यांचा समावेश आहे. 2024 हे लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असणार आहे काही राज्यांमध्ये बँका तब्बल 14 दिवस बंद असणार असून बँकेचे कामकाज पंधरा दिवस चालणार आहे त्यामुळे बँका संबंधित सुट्ट्यांचे वेळापत्रक आत्ताच पाहून घ्या.

हे पण पहा --  Bank Holidays : बापरे... अर्धा ऑक्टोबर बँका बंद, कर्मचाऱ्यांची लाॅटरीच; अशा आहेत सुट्ट्या

बँकांना 14 दिवस सुट्टी

फेब्रुवारी महिन्यात अनेक सण येत असल्याकारणाने या सुट्ट्या दिसत आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी 2014 मध्ये बँकांना वेगवेगळ्या राज्य मध्ये असलेल्या सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी अशा एकूण नऊ सुट्ट्या सुद्धा असणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी RBI 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.

Bank Holiday List In February

फेब्रुवारी महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

4 फेब्रुवारी : रविवार

10 फेब्रुवारी : दूसरा शनिवार 

11 फेब्रुवारी : रविवार

10 ते 12 फेब्रुवारी : लोसरनिमित्त सिक्किम राज्यात बँकांना सुट्टी

14 फेब्रुवारी : वसंत पंचमी निमित्त हरयाणा, ओदिशा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.

15 फेब्रुवारी : लुई-नगाई-नी निमित्त मणिपूरमध्ये बँकांना सुट्टी असेल.

18 फेब्रुवारी : रविवार

19 फेब्रुवारी : छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँकांना बंद राहतील.

20 फेब्रुवारी : मिजोरम आणि अरुणाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त या राज्यांमध्ये सुट्टी

24 फेब्रुवारी : चौथा शनिवार 

25 फेब्रुवारी : रविवार

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment