Close Visit Mhshetkari

Aadhar Card Update : आधार कार्डबाबत आले नवे अपडेट; आता 8 दिवसांत मिळेल ‘ हा ‘ मोफत लाभ  

Aadhar Card Update : नमस्कार मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे. आधार कार्ड भारतीय नागरिकांची ओळख म्हणून ओळखले जाते कारण आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे ओळखपत्र म्हणून ओळखले जाते.

एक भारतीय नागरिकाचे महत्त्वाचे कागदपत्र असून त्यावर त्या नागरिकांचे नाव ,पत्ता ,वय, लिंग, व्यवसाय संपर्क क्रमांक व फोटो अशी सर्व आवश्यक माहिती त्यामध्ये दिलेली असते. यामुळे आधार कार्ड भारतातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून ओळखले जाते.

Aadhar Card New Rules

आधार कार्ड काढल्यानंतर काही वर्षांनी ते अपडेट करावे लागत असते. जर तुम्हीही तुमच्या आधार कार्ड अपडेट करण्याचा विचार करत असाल, तर लवकरात लवकर करा. कारण तुमच्याकडे केवळ आता 8 दिवस राहिले आहे.

बँकेत खाते उघडायचे असो किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा कुठे पर्यटन स्थळी फिरायला जायचे असो. सदर तुम्हाला सिम कार्ड जरी घ्यायचं असेल तर आता तुम्हाला आधार कार्डची गरज भासते.

तुमची जर आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर, तुमचे अनेक काम रोखल्या जातात. तुम्हाला जर तुमच्या आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर, खालील प्रमाणे करता येईल.

आधार अपडेटसाठी  आवश्यक बाबी

तुम्ही तुमचे आधार कार्ड स्वतः आधार केंद्रावर जाऊन व घरामधून ऑनलाइन पद्धतीने अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या डेमोग्राफिक डेटा पूर्ण पत्ता जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक माहिती लागते. आधार कार्ड अपडेट करताना बराच डेटा तुम्ही सहजच ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरता येतो.

हे पण पहा --  Aadhar Card rules : पासपोर्ट प्रमाणेच होणार तुमच्या आधार कार्ड चे व्हेरिफिकेशन, सरकार बदलणार आहे नियम !पहा सविस्तर माहिती..

Aadhar Card Update

पण मात्र आयरिस किंवा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावरच जावे लागेल. तुम्हाला अगोदर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. की मोफत आधार अपडेट ची सुविधा केवळ ऑनलाइन अपडेट वर उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्ही आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेला तर तुम्हाला आवश्यक शुल्क भरावे लागणार.

मित्रांनो तुमच्याकडे जर लॅपटॉप व इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही घरबसल्या आरामात ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करू शकता यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमचे आधार कार्ड सहजरीत्या घरी बसून अपडेट करू शकता.

How to update Aadhaar Card

  • UIDAI च्या https://uidai.gov.in/mr/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • यावर आधार अपडेटचा पर्याय निवडा. ‘माझे आधार’ या मेनूमध्ये ‘आधार अपडेट करा’ वर क्लिक करा.
  • जो डेटा अपडेट करायचा आहे त्याचा पर्याय निवडा उदा. पत्ता अपडेट करण्यासाठी ‘अपडेट ॲड्रेस’ हा पर्याय निवडावा.
  • आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. तुम्हाला OTP पाठवला जाईल.
  • मोबाईल नंबरवर OTP येईल तो भरून घ्या. OTP टाकल्यावर तुम्ही पुढे जाऊ शकाल.
  • पुढे Documents Update चा पर्याय निवडा.
  • तुम्हाला अपडेट करायचा असलेला डेटा निवडा.
  • तुमच्यासमोर आधार कार्डशी संबंधित तपशील येईल. सर्व तपशील सत्यापित करा.
  • पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा.
  • स्वीकार्य कागदपत्रांची यादी तुम्हाला वेबसाईटवर मिळेल.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment