Close Visit Mhshetkari

Weather update : राज्यात हिवसाळा; आज पासून ‘या’ जिल्ह्यात पावसाचा इशारा; पहा हवामान अंदाज

Weather update : महाराष्ट्रात हळूहळू थंडीला सुरुवात झाली असली तरी पुन्हा एकदा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येणार आहे.

Maharashtra Weather update

मालदीव ते दक्षिण महराष्ट्र या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने येणाऱ्या रविवारी म्हणजेज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

दिनांक २५ व २६ नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्र,कोकण गोवा, मराठवावाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यात आज पासून पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Imd weather forecast

हवामान विभागाकडून महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये २ दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे.महाराष्ट्रात २५ नोव्हेंबर नंतर मुंबई, ठाणे, पालघर येथे मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारपासून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशीव येथेही पावसाची शक्यता आहे.

हे पण पहा --  Maharashtra Rain : पावसाचा मुक्काम वाढला; राज्यात पुढील काही दिवसात संततधार

Leave a Comment