Sarpanch New Rules : नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील महत्त्वाचे पद म्हणजे सरपंच आता या सरपंच पदाविषयी नवीन शासन निर्णय किंवा नियम लागू झालेल्या असून यामुळे सरपंच महिलांच्या कामकाजामध्ये यापुढे आता सरपंच पती किंवा नातेवाईकांची लुडबुड खपवून घेतली जाणार नाही यासंदर्भात नवीन आदेश शासनाने काढलेला आहे बघूया सविस्तर माहिती
महिला पदाधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप होणार बंद
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की जिल्हा परिषदेपासून पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर महिला जिल्हा महिला सदस्यांना वेळोवेळी आपण अपमानास्पद वागणूक देण्यात येते.प्रत्यक्षात या महिला सदस्यांचे नातेवाईक किंवा पतीकडूनच कारभार चालवल्या जातो. यामुळे या संधी अनेक वेळा आंदोलन सुद्धा झाले होते.अशा व्यक्तींवर ती कारवाई करण्याची मागणी संबंधित महिला संघटनेकडून करण्यात आली होती.
आता अशा महिला सदस्यांच्या निकटवर्तीयांनी कार्यालयीन कामामध्ये हस्तक्षेप करू नये तसेच पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये मुळीच बसता कामा नये, यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयाकरिता आचारसंहिता (Sarpanch New Rules) लागू करण्याचा निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ६ जुलै २०२३ ला घेतलेला आहे.
Sarpanch new updates
संबंधित नियमांचे किंवा आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळल्यास जिल्हा परिषद,पंचायत समित्या गैरवर्तणुकीमुळे पदावरून दूर करणे तसेचजिल्हा परिषद व पंचायत समितीमधील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची व ग्रामपंचायत सदस्यांनी गैरवर्तणूक केल्यास सरपंच, उपसरपंच व सदस्यांना गैरवर्तणुकीबद्दल चौकशीनंतर कारवाई करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते.