Close Visit Mhshetkari

Local Holidays : आनंदाची बातमी … ‘या’ दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर; शासन निर्णय निर्गमित ..

Local Holidays : शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

Local Holidays for Employees

आता सन २०२४ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.

  • सुट्टीचा दिवस – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
  • इंग्रजी तारीख – ०६ डिसेंबर, २०२४
  • वार – शुक्रवार
  • भारतीय सौर दिनांक – १५ मार्गशीर्ष शके १९४६

सदरील आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/II/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात आली आहे.

हे पण पहा --  Public Holidays : मोठी बातमी ! सन 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर ! पहा केव्हा आणि कधी मिळणार सुट्ट्या ....

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२०४१११८२६७३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Leave a Comment