RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा धक्का दिला असून RBI ने रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे.यामुळे सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहे.परिणामी सामान्य माणसाला पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
RBI Repo Rate increase
देशातील महागाई दर खाली आल्यानंतरही रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा धोरणात्मक दरांमध्ये (रेपो रेट) वाढ करण्याची घोषणा केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीनंतर आता येत्या काही दिवसात देशातील सर्व सरकारी-खासगी बँकांपासून अन्य वित्तीय संस्था आपल्या गृहकर्जाचे व्याजदर वाढणार आहे.त्यामुळे तुमचा EMI महाग होणार आहे.तुमचा EMI किती महाग होईल याबद्दल गणित समजून घेऊया.
रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर गृहकर्जाच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे.मे 2022 मध्ये जेव्हा 4 % रेपो रेट होता आता वाढ होऊन तो 6.5 % वर पोहोचला आहे.
Loan EMI Calculator
व्याज वाढीवर गव्हर्नर म्हणाले,गेल्या तीन वर्षात जागतीक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामानुसार जगभरातील मध्यवर्ती बँकांना व्याजदार वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.आता रेपो रेट वाढल्याने हप्तमध्ये किती वाढणार आहे.