HSC time table : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की;सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. अशातच महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे.
HSC time table 2024
बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा (SSC) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 8 ते 10 दिवस परीक्षा लवकर होणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 पहिली शिफ्ट आणि दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत दुसरी सिफ्ट असणार आहे.
दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असणार आहे.
Board Exam Time table Download
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थीना वेळापत्रक डाऊनलोड करता येणार आहे.इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे हॉल तिकीट (Hall ticket) जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.
महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल.विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडीच ते 3 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.HSC time table 2024