Post Office Scheme : आज आपण पोस्ट ऑफिस मधील एक अशा योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत,ज्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम दामदुप्पट मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या योजना असतात ज्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आपल्याला फायदा मिळतो,अशाच या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
Post office scheme
देशातील कोणताही नागरीक किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतो.KVP ही एक बचत योजना आहे.गुंतवणुकीत जास्त जोखीम घेण्याची इच्छा नसलेल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणण्यात आली आहे. किसान विकास पत्र या योजनेतून चांगला परतावा देण्यात येतो. यामुळे योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांची संख्या मोठी आहे.
गुंतवणूक केल्यानंतर आयकरामध्ये देखील सवलत देण्यात येते.यामुळे गुंतवणुकीसोबतच कर बचतीसाठी देखील हा चांगला पर्याय आहे. देशातील प्रत्येक टपाल कार्यालयात किसान विकास पत्र काढण्याची सोय उपलब्ध आहे.बँक दिवाळखोरीत गेली तर ग्राहकाला किती ही गुंतवणूक केली असली तरी केवळ 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते.पोस्ट खात्यात दिवाळखोरीचा कोणताच विषय नसल्याने येथील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. किसान विकास पत्र योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात
गुंतवणुकीची रक्कम
या योजनेत तुम्हाला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल.किसान विकास पत्र योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकते.या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसून आपण कितीही रक्कम गुंतवू शकता.
कोण उघडू शकेल खाते ?
1. वैयक्तिक खाते – हे खातं प्रौढ व्यक्ती स्वतःसाठी उघडू शकतात. आपल्या अल्पवयीन किंवा मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या पाल्याचं खातं उघडण्यासाठीही आई-वडिलांना परवानगी आहे.
2. सयुक्त खाते – हे एकप्रकारे संयुक्त खातं आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त तीन व्यक्ती आपलं संयुक्त खातं सुरू करू शकतात. या प्रकारात खात्यातील पैसे काढण्याचे अधिकार तिघांना असतात.
3. सयुक्त खाते ब – या प्रकारातही जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्त खातं उघडू शकतात. मात्र पैसे काढण्याचे अधिकार कोणत्याही एका व्यक्तीकडेच देण्यात आलेले असतात.
किसान विकास पत्र योजनेचा कालावधी
‘किसान विकास पत्र’ या योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.
मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद करणे
किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.