Close Visit Mhshetkari

कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण कसे करावे ? Pink Bollworm

Pink Bollworm : भारतात सर्वत्र कापूस लागवड (Cotton Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यात देखील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कापसाची शेती करत असतात. राज्यात मराठवाडा विदर्भ आणि खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Farming) केली जाते.आपल्या महाराष्ट्रात कापसाचे उत्पन्न हे खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे.गेल्या काही वर्षापासून कपशी पिकावर बोंड अळी,लाल्या रोग यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे.

Pink Bollworm
Pink Bollworm

कापूस गुलाबी बोंडअळी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अलीकडील काही वर्षात गुलाबी बोंड अळी (Pink Bollworm) मुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. परिणामी गेल्या काही वर्षात कापसाचे क्षेत्र देखील कमी झाले आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की,गुलाबी बोंड अळी कापसाच्या बोंडमधील सरकी खात असल्याने व आपली विष्ठा बोंडमध्येच सोडत असल्याने कपाशीची गुणवत्ता खराब होते. शिवाय गुलाबी बोंड आळी मुळे कापसाच्या पूर्ण पाकळ्या न उमलने, कवडी कापूस होणे, कापूस हलका भरणे इत्यादी समस्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते.

कपाशी गुलाबी बोंडअळी यामुळे कापसाच्या उत्पादनात भलीमोठी घट बघायला मिळते परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते. हेच लक्षात घेता आज आपण गुलाबी बोंड अळी वर प्रभावी नियंत्रण कसे मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.

cotton pink bollworm

गुलाबी बोंड आळी वर या पद्धतीने मिळवा नियंत्रण 

गुलाबी बोंड अळीचे संकट टाळण्यासाठी कापूस डिसेंबर महिन्यानंतर शेतातून काढून टाकणे अतिशय महत्त्वाचे ठरते. म्हणजेच शेतकरी बांधवांनी कापसाचे फरदड उत्पादन टाळावे. कापूस शेतातून बाहेर काढल्या नंतर शेताची खोल नांगरट करावी. या उपाययोजना केल्या तर कोषावस्थेतील किडीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येणे शक्य होते.

मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, गुलाबी बोंड आळीचे पतंग साधारणपणे कापूस लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी कोषातून बाहेर पडतात व पाते, फुले यावर अंडी घालतात. यामुळे गुलाबी बोंडआळी वर नियंत्रण ठेवण्यासाठी कापूस लागवडी नंतर लगेचच उपाययोजना कराव्या लागतात.

एकदा अंड्यातून आळया बाहेर पडल्या की त्या बोंडात प्रवेश करून सरकी चे नुकसान करतात. शिवाय गुलाबी बोंड अळी एकदा बोंडात घुसली की बाहेरून फवारलेले औषध फारसे प्रभावी ठरत नाही. यामुळे गुलाबी बोंड अळीमुळे कापसाचे नुकसान अटळ ठरते. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो.

शिवाय जमीन नापीक होण्याचा धोका देखील कायम असतो. यामुळे कापूस लागवड केल्यानंतर साधारणपणे 45 दिवसांच्या आसपास गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी खाली सांगितलेल्या पर्यायाचा आपण निश्चितच वापर करू शकता आणि गुलाबी बोंड आळी वर प्रभावी नियंत्रण मिळवू शकता.

बोंडअळी वर नियंत्रण कसे करावे?

सुरवंट फुलांच्या कळ्या, पॅनिकल्स आणि बोंडांना खाऊन करतात. प्रवेशाची छिद्रे बियांच्या बोंडामध्ये पोसणाऱ्या अळ्यांच्या मलमूत्रामुळे बंद होतात. ते दोन शेजारील बियांमध्ये खिडकीची छिद्रे पाडून दुसरीकडे जागा तयार करतात आणि शेवटी त्यांचे नुकसान करतात. आक्रमण झालेल्या कळ्या आणि अपरिपक्व बोंडे गळतात. लिंट नष्ट होते, जिनिंग टक्केवारी आणि तेलाचे प्रमाण खराब होते.

हे पण पहा --  Last cotton spray : कपाशीवर महत्वाची आणि शेवटची फवारणी कोणती करावी?

हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वच्छ मशागत आणि पिकांचे अवशेष (गळलेली पाने, डहाळे इ.) नष्ट करणे.सुप्तावस्थेतील अळ्या / pupae उघडकीस आणण्यासाठी खोल नांगरणी करा.

पिकाची उशिरा पेरणी टाळा. लवकर पेरणी केल्याने लवकर परिपक्वता येण्यास मदत होते आणि सुटकेची सोय होते.

सहनशील वाणांचा वापर (खंडवा-2, जेकेएच-1, अबादिता, एलएच 900, सुजय आणि देशी कापूस).जास्त हिवाळ्यातील लोकसंख्येची वाढ कमी करण्यासाठी दीर्घकाळ उशीरा बोंडाचे उत्पादन/निर्मिती टाळण्यासाठी सिंचनाचे पाणी रोखणे.

How do you control bollworms in cotton?

यांत्रिक नियंत्रण  :-

मित्रांनो गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी फेरोमोन सापळे वापरा कीटकनाशकांचा वापर करा / कीटकांच्या लोकसंख्येवर लक्ष शेतात चहूकडे कामगंध सापळे लावावे असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात. कृषी तज्ञांच्या मते, एकरी 5 ते 7 कामगंध सापळे (Pheromone traps) लावल्याने गुलाबी बोंड आळी वर प्रभावी नियंत्रण मिळवता येणे शक्य होते.

कामगंध सापळ्यात नर पतंग अडकतात आणि या अळीचे प्रजनन कमी होते परिणामी गुलाबी बोंड आळी कापसावर कमी अटॅक करते. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होत नाही परिणामी कापसाच्या पिकातून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.

किटकनाशक फवारणी  :-

कृषी तज्ञांच्या मते गुलाबी बोंड आळी वर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी पोळ्याच्या आमावस्येच्या आसपास अंडीनाशक औषधी प्रोफेनोफॉस (क्यूराक्रॉन किंवा प्रोफेक्स) फवारणी करावी.यामुळे गुलाबी बोंड अळीचा अंड्यातचं नायनाट होतं असल्याचा दावा केला जातो. खरं पाहता अमावस्याच्या रात्री फवारणी करण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे बोंडआळीच्या नर मादी प्रजनन हे अंधाऱ्या रात्री सर्वोच्च होते म्हणून पोळ्याच्या अमावस्येला ही फवारणी केली तर गुलाबी बोंड आळीचे कायमचा नायनाट केला जाऊ शकते.

शेतकरी मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते,कापसाचे पीक 60-70 दिवसांचे झाल्यावर बोंडआळीची पुढची पिढी पुन्हा जोमाने हल्ला करण्यास तयार होते, त्यावेळी देखील या औषधाची दुसरी फवारणी करावी. यामुळे गुलाबी बोंड आळी वर प्रभावी नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचा दावा केला जातो.

जैविक नियंत्रण :-

ट्रायकोग्रामा चिलोनिस किंवा ब्रॅकन एलिचिडे किंवा इलास्मस जॉन्सटोनी किंवा प्युपल पॅरासाइटॉइड मायक्रोब्रॅकोनलेफ्रॉई हे अंड्याचे परजीवी सोडणे PBW ची लोकसंख्या नियंत्रित ठेवते .

भक्षक क्रायसोपेर्ला झास्ट्रोविएराबिका स्कायमनस एसपीच्या क्रियाकलापांना प्रोत्साहन द्या किंवा ट्रायफल्स टँटिलस किंवा पायरेमोटेसव्हेंट्रिकॉसस (माइट) किंवा त्यांना शेतात सोडा.Btk जिवाणू फॉर्म्युलेशन लागू करा (1 किलो/हेक्टर)

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment