Close Visit Mhshetkari

Navy Recruitment : दहावी व आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची सुवर्णसंधी पहा सविस्तर माहिती

Navy Recruitment : नमस्कार मित्रांनो नोकरी विषयक माहिती मध्ये आपली पुन्हा स्वागत आहे. आपल्याला माहीतच आहे. की अनेक तरुणांना नौदल तसेच आर्मी अशा क्षेत्रामध्ये नोकरी करायला आवडते आणि या क्षेत्रात नोकरी करायची म्हणून ते आपली तयारी सुद्धा सुरू ठेवत असतात. 

भारतीय नौदलाने दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

विविध पदांसाठी आहे ही भरती?

या भरतीमध्ये एकूण 910 पदे रिक्त आहेत. यामध्ये ट्रेड्समन मेट (610), चार्जमन (42) आणि वरिष्ठ ड्राफ्ट्समन (258) पदे आहेत.

1- यामध्ये ट्रेड्समन मेट या पदाचे 610 पदे रिक्त असून ते प्रामुख पूर्व, पश्चिम आणि दक्षिणे नौदल कमांड या ठिकाणचे आहे.

2- चार्जमन( दारूगोळा कार्यशाळा आणि कारखाना) 42 पदे रिक्त आहे.

हे पण पहा --  Central Bank Of India : दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी लगेच करा अर्ज तब्बल 484 पदाची बंपर भरती

3- वरिष्ठ ड्राफ्ट्समन( इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कन्स्ट्रक्शन, कारटोग्राफिक आणि आर्मामेन्ट) 258 पद रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता

ट्रेड्समन मेट – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय

चार्जमन – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रात बीएससी किंवा डिप्लोमा

वरिष्ठ ड्राफ्ट्समन – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रात आयटीआय किंवा डिप्लोमा

वयोमर्यादा

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी: 18 ते 25 वर्ष

वरिष्ठ ड्राफ्ट्समन पदासाठी: 18 ते 27 वर्ष

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड अर्जाची स्क्रीनिंग आणि त्यानंतर संगणक आधारित परीक्षा (INCET) द्वारे केली जाईल.

अर्ज शुल्क

सामान्य उमेदवारांसाठी: ₹295

एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/माजीसैनिक/महिला उमेदवारांसाठी: नाही

अर्ज कसा करावा

इच्छुक उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “Navy Recruitment : दहावी व आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची सुवर्णसंधी पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment