यावर्षी पण कापूस बाजार भाव तोऱ्यातच.. Cotton rate

Cotton rate : कापसाचे बाजार भाव गेल्या दिवसात तुमच्यापासून लपून राहिलेले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार तेजीत असून आता ते जवळपास स्थिर झाला आहे. पण तुमच्यापैकी अनेक बांधवांना कापसाचे पुढे काय होणार हे जाणून घेण्याची खूप इच्छा असेल.तर आज आपण आगामी काळात कापूस बाजार भाव तेजीत का राहतील, त्याचे कारण काय याची माहिती पाहणार आहोत.

Cotton rate
Cotton rate

Cotton market price

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू होईल,तेव्हा जुना माल न राहिल्याने,नव्या मालालाच मागणी राहील.दरवर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर ३० ते ४० लाख गाठी या जुन्याच असतात;मात्र यंदा यामध्ये मोठी घट होऊन,१ ते ३ लाख गाठीच राहण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मागणी कायम राहणार आहे.भारतातून निर्यात होणाऱ्या कापसाचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे.देशभरातील सूत गिरण्यांमध्ये कापसाची मागणी वाढणार आहे.

२०१३ ते २०१८ पर्यंत कॉटन बाजारात मंदीआल्यामुळे देशभसतील अनेक सूत गिरण्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाला जी मागणी पाहिजे होती.ती मिळत नसल्याने, त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून आला; मात्र त्यात चीन अमेरिकेचे ट्रेड वॉर,आंतरराष्ट्रीय बाजारात घटलेली मागणी, पाकिस्तानला माल देणे थांबविणे अशा विविध कारणांमुळे कापसाची मागणी घटली होती.त्यात उत्पन्न हे सुमारे ३ कोटी ५० लाख गाठींपर्यंत,त्यामुळे कापसाला हमीभाव देखील पुरेसा मिळत नव्हता.

Kapus bajar bhav

यावर्षी देखील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत बाजारात देखील कापसाला मागणी कायम राहण्याची शक्यता आहे.सूत गिरण्यांमध्ये वाढ झाली आहे.गुजरातमध्ये ५० लाख गाठींची गरज होती; मात्र आता हीच मागणी १ कोटी गाठींपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे यंदा कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

हे पण पहा --  Cotton crop season : नोव्हेंबर मध्ये कापसाचे दर असतील तेजीत, पहा काय मिळेल भाव

जानेवारीपूर्वी ५२ हजार रुपये प्रति खंडी असलेल्या कापूस दराने आता लाखावर उसळी घेतली आहे.इतकी दरवाढ होऊनही कापसाची उपलब्धता कमी प्रमाणात आहे.देशभरातील सूतगिरण्यांना उत्पादन बंद करण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत. दक्षिण भारतातील साऊथ इंडियन मॅन्युफॅक्चर्स स्पिनर्स असोसिएशन या सूतगिरणी उत्पादक संघटनेने कापूस उत्पादन बंद करण्याचा निर्धार पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.(Kapus bajar bhav)

कापूस बाजार भाव

>> शासनाने निश्चित केलेला हमीभाव ६०२५ रुपये क्विंटन

>> ऑक्टोबर – ७ हजार ७००

>> नोव्हेंबर – ८ हजार ते ८२००

>> डिसेंबर व जानेवारीचे – ७८०० ते ८२००

>> फेब्रुवारी – ९०००

>> मार्च १० हजार

>> एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक भाव १२ हजार

>> सध्यस्थितीत खासगी बाजारातील भाव ११,५०० ते १२ हजार

भारतात एकूण होणारे  कापूस उत्पादन

•• ३ कोटी ६० लाख गाठी

•• देशातील बाजारात ३ वर्षापूर्वीची मागणी २ कोटी ८० गाठी

•• सध्यस्थितीत देशाच्या बाजारात कापसाची मागणी ३ कोटी ४० लाख गाठी.

•• विदेशात होणारी निर्यात ६० ते ७० लाख गाठी

Leave a Comment