Close Visit Mhshetkari

Kusum yojana : कुसूम सोलर योजना पात्र अपात्र याद्या आल्या! पहा आपले नाव

Kusum yojana : महाराष्ट्र शासनाने 2 लाखापेक्षा जास्त कुसुम सोलर पंप वाटप करण्याचे उद्दिष्ट हाती घेतलेले असून 2022 – 2023 या वर्षासाठी विविध जिल्ह्यामध्ये कुसुम सोलर पंप या योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू केले होते.त्याच्या पात्र व अपात्र याद्या जाहीर करण्यात आली आहे.

पीएम कुसुम सौर पंप योजना महाराष्ट्र

कुसुम योजनेच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या दि.10  फेब्रुवारी,2022 रोजीच्या बैठकीमध्ये वित्तवर्ष 2022- 2023 मध्ये कुसुम टप्पा-2 अंतर्गत 50 हजार नग सौर कृषिपंप आस्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार दि. 13 एप्रिल 2022 रोजी 14 पुरवठादारांना कार्यादेश निर्गमित करण्यात आले असून अंमलबजावणी वेगाने सुरु आहे.

Kusum solar yojana 2023

याद्वारे 2.5 एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 HP,5 एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP सौर पंप वाटप करण्यात येणार आहेत.

कृषी पंपाची किंमत 3 HP – 1.56 लक्ष रुपये , 5 HP पंप – 2.225 लक्ष रुपये , 7.5HP पंप – 3. 435 लक्ष रुपये असणार आहे. सौर पंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून सर्व कृषी पंपाच्या किमतीच्या 10% तर अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 % रक्कम भरून घेतली जाणार आहे.

हे पण पहा --  Kusum yojana : खुशखबर..नवीन 2 लाख सोलर पंप बसणार! 'या' शेतकऱ्यांचा सामावेश,पहा यादी

PM kusum solar pump scheme

देशातील शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून देणे,जेणेकरून शेतकरी त्यांच्या शेतात योग्य पद्धतीने सिंचन करू शकतील.

शेतकरी दुहेरी लाभ होईल तो म्हणजे लाईट बिल वाचेल व आर्थिक लाभ होईल,त्याच पैशातून शेतकऱ्याला त्याच्या इतर शेत गरज पूर्ण करता येतील.शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल आणि शेतकरी समृद्ध होईल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment